spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारत जोडो यात्रेत काँग्रेसबरोबर जनताही रस्त्यावर उतरल्याने भाजपाचा जळफळाट ; नाना पटोले

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेला दररोज प्रचंड पाठिंबा मिळत आहे. ही पदयात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नसून लोकशाही व संविधान वाचले पाहिजे अशी भावना असलेल्या प्रत्येकाची आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेला दररोज प्रचंड पाठिंबा मिळत आहे. ही पदयात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नसून लोकशाही व संविधान वाचले पाहिजे अशी भावना असलेल्या प्रत्येकाची आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणानंतर महाराष्ट्रात जनतेचा या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असून भारत जोडो यात्रा आता ‘जनयात्रा’ झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, पट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, जीएसटी, चीनने भारताच्या हद्दीत केलेले अतिक्रमण या देशातील ज्वलंत समस्यांवर केंद्रातील मोदी सरकार गप्प आहे.जनतेच्या समस्या सोडवण्याकडे या सरकारचे लक्ष नसून इतर मुद्दे चर्चेत आणले जात आहे. भाजपा सरकारच्या या नाकर्तेपणावर जनतेमध्ये तीव्र संताप आहे तो संताप, त्यांच्या तीव्र भावना हे लोक भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्याशी व्यक्त करत आहेत. भाजपा सरकारवर जनतेचा प्रचंड रोष असल्याचे या पदयात्रेच्या माध्यमातून समजत आहे. या लोकभावनाच आता भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर करतील. असे नाना पाटोले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी! राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय

भारत जोडो यात्रा निघाल्यापासून भाजपाचे नेते टीका करत आहेत पण या पदयात्रेला मोठे जनसमर्थन देऊन जनताच भाजपाला चोख उत्तर देत आहे. भाजपाच्या टीकेची काँग्रेस पर्वा करत नाही, त्यांच्या टीकेचा पदयात्रेवर काहीही परिणाम होत नाही उलट जनतेचा दररोज पाठिंबा वाढतच आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे समर्थन केले आहे पण भाजपाच्या काही लोकांचा भारत जोडो यात्रेला मिळणारे समर्थन पाहून जळफळाट होत असलयाचे पाटोले यांनी म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बावनकुळे यांनी दिलेली उपमा खरीच आहे, पण ते गुजराती नेत्यांचे धनाजी आणि संताजी आहेत. लॉलीपॉप देऊन ते सरकार चालवत असून भ्रष्टाचार, भयाने आलेले हे सरकार असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Jitendra Awhad : आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ७२ तासात दुसरा गुन्हा दाखल

Latest Posts

Don't Miss