नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी, म्हणाले…

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक गुंतवणूक केली जाते. अनेक परदेशी कंपन्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करतात. गुंवणूकीसाठी महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.

नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी, म्हणाले…

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक गुंतवणूक केली जाते. अनेक परदेशी कंपन्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करतात. गुंवणूकीसाठी महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. देशातून महाराष्ट्र राज्य हे गुंतवणुकीसाठी अव्वल ठरले आहे. मात्र मागील काही वर्षात अनेक राज्यासाठी फायदेशीर असलेले महत्वाचे उपक्रम महाराष्ट्राच्या हातून निसटले. पण आता महाराष्ट्राला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. केंद्र सरकारने मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मान्यता दिली आहे. हा मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प २२ हजार कोटी रुपयांचा असून केंद्राकडून याला मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकेतील दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब होईल. या प्रकल्पाच्या निमित्ताने महाष्ट्राला एक सुवर्ण संधी चालून आली आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा अशी मागणी नाना पटोले यांच्या कडून करण्यात आली आहे.

मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रातच व्हावी याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. या पत्राद्वारे नाना पटोले पुढे म्हणतात की, ” महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर चीपचा प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून १. ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती व लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार होते. तसेच पूरक उद्योगांमधूनही मोठया प्रमाणात रोजगार मिळणार होते पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी मायक्रॉन प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रात व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करायला हवेत. महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात या प्रकल्पासाठी अत्यंत अनुकुल वातावरण आहे. पुणे हे औद्योगीक क्लस्टर असून विमानतळ, बंदरे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे.

वेदांता रिसोर्सेसची उपकंपनी ही वेदांता लिमिटेड आहे. ही कंपनी तेल आणि वायू. जस्त, चांदी, शिसे, पोलाद, तांबे, ऍल्युमिनिअम (Aluminum) यावर आधारित अनेक उत्पदनांचे उत्पादन करते. फोक्सकॉन (Foxconn) कंपनी ही एक आयफोन कंपनीची कंत्राटी उत्पादक कंपनी म्हणून प्रख्यात आहे. तंत्रज्ञान नवकल्पना (Technology innovation), सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर एकत्रीकरण (Software and hardware integration) आणि औद्योगिक डिझाइनसाठी एकात्मिक दृष्टिकोन असलेले उत्पादन (A product with an integrated approach to industrial design) ही कंपनी तयार करते.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी ,छगन भुजबळ

मुंबईमध्ये ईडीचे १५ ठिकाणी छापे, संजय राऊत यांच्या मित्रावर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version