spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रिफायनरीला फक्त ‘तोडपाणी’ साठी विरोध करत आहेत, Narayan Rane यांचा विरोधकांना टोला

भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल (मंगळवार, ९ जुलै) रत्नागिरी येथील राजापूर (Rajapur) शहरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. राजापूर शहराला पुराचा फटका बसला होता. त्यामुळे, अनेकांचे मोठं नुकसान या पुरामुळे झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजापुरात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोकणातील रिफायनरी प्रकल्पावर (Kokan Refinery Project) मोठे भाष्य करत, “रत्नागिरीत येऊन रिफायनरीला जे विरोध करत आहेत ते तोडपाणीसाठी विरोध करत आहेत,” असा आरोप विरोधकांवर केला आहे.

नारायण राणे म्हणाले, “कोकणात मी रिफायनरी आणणार. रिफायनरी कंपनीने आम्ही इथे येतो असं सांगू दे. इथले लोक गरीब आहेत विरोध करण्यासाठी इथल्या गरीब माणसांसाठी पैसे द्यावेत. रत्नागिरीत येऊन रिफायनरी ला जे विरोध करत आहेत ते तोडपाणीसाठी विरोध करत आहेत. रिफायनरी साठी मी स्वतः प्रयत्न करणार. रिफायनरी साठी उद्धव मीया विरोध कराला आला की तुम्हाला दिसतो. रिफायनरी साठी आवश्यक पाठपुरावा मी करेन. रत्नागिरी सिंधुदुर्गात विरोधकांना येऊ देत नाही.”

पुढे शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “वीज प्रकल्प सुरू होत असताना कोळशावरचे प्रकल्प बंद होणे म्हणून उद्धव ठाकरेंनी पैसे मागितले. ऍडव्हान्स मध्ये उद्धव ठाकरे यांनी पैसे घेतले हा प्रश्न विधानसभेत आला आहे. अशा लोकांना इथं प्रवेश का द्यायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजापुरात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, “राजापुरात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या. पुराचा त्रास राजापूर वासियांना होऊ नये यासाठी प्रयत्न करणार. मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे. रिफायनरी विरोधकांनी माझ्यासमोर बसावे. विरोध कोण करतय, रिफायनरीला विरोध करा मग पाहूया. रिफायनरी ला विरोध करणारे जिल्ह्यातून परत जाणार नाहीत. पोटाचे राजकारण करा. रिफायनरीला विरोध करणारे आपलेच काही लोक आहेत,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

मनोज जरांगे यांचा मंत्री छगन भुजबळांवर जातीवादाचा आरोप, म्हणाले- ‘दंगल भडकवतोय…’

पुण्यात कायमस्वरुपी ड्रायविंग लायसन्स होणार बंद ? पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss