spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नारायण राणेंनी मविआच्या कार्यकर्त्यांना दिली धमकी, “… एकेकाला ठेचून मारुन टाकेन”

सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आता विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध महाविकासआघाडीचे कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. मालवण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पाहणीसाठी आले त्यावेळी आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावरच राडा झाल्याचे पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी खासदार नारायण राणे हे त्या किल्ल्यावर दाखल झाले. यामुळे पोलिसांनी नारायण राणेंना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर थांबवून ठेवले. यावरुन नारायण राणे आणि निलेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला घेतले. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामरी झाली. यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरधार घोषणाबाजी करण्यात आली.

तर या राड्यावर खासदार नारायण राणेंनीही प्रतिक्रिया दिली. यापुढे आमचे पोलिसांना असहकार्य असेल. त्यांना येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली. आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे हे त्यांचा मुलगा निलेश राणेंसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांनी राणे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशीच थांबवलं. यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी पोलिसांनी सक्त ताकीद दिली. आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता. त्यानंतरही हे कसं काय घडलं? हे बाहेरुन येऊन अंगावर येत आहेत. हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना गपचूप निघायला सांगा. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा नाही. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही, असे निलेश राणे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss