नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यवार बरसले

शिवसेना दोन्ही गटात झालेल्या हाणामारीच्या प्रकरणावरून तर रोशनी शिंदे यांच्या झालेल्या प्रकरणावरून नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांसमोर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यवार बरसले

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाला गुंडप्रवृत्तीचे राजकारण आपण म्हणू शकतो. राजकारणाला एक वेगेळेच वळण निर्माण झाले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. त्यानंतर मग माविआ नावाचे नवीन समीकरण तयार झाले आणि एकीकडे शिंदे सरकार आणि भाजप असे नवीन समीकरण तयार झाले. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मिंधे गटात काल महिला कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटात झालेल्या राड्याता रोशनी शिदंडे यांना हाणामारी करण्यात आले त्यानंतर रोशनी शिंदे यांना संपदा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत त्यांना भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांची भेट घेऊन झाल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे आणि पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदे मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आपल्या राज्याला मिळालेले उपमुख्यमंत्री हे फडतूस आहे असा उल्लेख यावेळी त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावर प्रतिउत्तर दिल आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही फडतूस नाही तर काडतूस सरकार आहोत. या परकटचे प्रतिउत्तर एकमेकांवर होताना पाहायला मिळाला.YouTube video player

त्याच पार्शवभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘फडतूस’ असा उल्लेख केला असताना त्यावर आक्षेप घेत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना ‘महाफडतूस’ म्हणत टीका केली. नारायण राणे यांनी सांगितले की , उद्धव ठाकरे हा महाफडतुस माणूस, आणि खोटारडा माणूस आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला, २०१९ साली मीच देवेंद्र फडणवीसांना युती न करण्याचा सल्ला दिला होता,त्यावेळी नारायण राणे देवेंद्र फडणवीस याना असं ही म्हणाले की ,सगळं संपलंय शिवसेनेचं. काही कामाचं नाही असे मत त्यांनी व्यक्त केले होते. तसेच उद्धव ठाकऱ्यांबद्दल बोलताना नारायण राणे म्हणतात, अडीच वर्षात फक्त अडीच तास बसून राज्यच कार्यकाळ सांभाळला याना काय कळणार? तसेच उद्धव ठाकरे याची देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलण्याचीलायकी नाहीये असे हि वक्त्यव्यात्यानी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले.
तसेच नारायण राणे यांनी एक (open challenge) उद्धव ठाकरे याना दिलं आहे की, एकाच मंचावर मला आणि उद्धव ठाकरे याना बसवा मग बघू कोणाला सामान्यांच्या प्रश्नांनाबद्दल जास्त माहिती आहे आणि राजकारबद्दल कोणाला जास्त समजते. असं मी ठामपणे सांगू शकतो की ,उद्धव पेक्षा मी जास्त बोलेन. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करताना नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या काळात मी शिवसेना निर्माण करणारा आणि शिवसैनिकांना सोडून जाणारा शिवसैनिक आहे. मला कशाचीच परवा पडत नाही.असे सांगितले. बाळासाहेबाच्या हाताखाली काम करणारा मी सामान्य नागरिक होतो. तसेच बाळासाहेब तुला सुरक्षित करून गेले परंतु तुला पक्षाची कार्यक्षमता अजिबात जमली नाही.तुला नेहमी support ची गरज असते. असे ठाम मत त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांसमोर मांडले.

या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे हे समजते. उद्धव ठाकरे यांच्या सोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना सोडलं तर त्यांच्याकडे कुटुंबापैकी कोणीच नाहीये असा घणाघाती हल्ला केला. शिवसैनिकांकणके कोणतेही कर्तुत्व्य उरलेले नाहीये. फक्त घोषणाबाजी करता येते. त्याचबरोबर नारायण राणे यांनी जनसमुदायाला प्रसवहहन केले आहेकि , उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याच सभेला जाऊ नये त्याचे कारण म्हणजे, उद्धव ठाकरेयांच्या सभेत सेम टू सेम मुद्दे बोलले जातात, तर त्यांचे भाषण देखील सारखेच असते. त्यामुळे तुम्ही त्यांची भाषणे हि घरात tv समोर बसून देखील ऐकू शकता असा टोला यावेळी नारायण राणे यांनी दिला आहे.

हे ही वाचा : 

नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यवार बरसले

पंकजा मुंडे यांनी सांगितला त्यांच्या नावाचा किस्सा

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाण्यात धडक मोर्चा, पोलीस आयुक्तालयाला लावणार ताळे?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version