Saturday, July 6, 2024

Latest Posts

NARAYAN RANE यांचे प्रतिनिधित्व जनतेने केले मान्य

लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी या मतदार संघातून नारायण राणे (Narayan Rane) सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. त्यांच्या विरुद्ध उभे असलेले उबाठा (UBT) गटाचे विनायक राऊत (Vinayak Raut) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यांच्या विजयात सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा महत्वपूर्ण होत्याच परंतु कुडाळ व मालवण या मतदारसंघातील मतदान आघाडी मिळवण्यास प्रचंड फायदेशीर ठरले. हे मतदार संघ उबाठा (UBT) गटाला मताधिक्य मिळवून देईल अशी अपेक्षा होती. परंतु या संघाने यांचा बिमोड केला, तर नारायण राणे यांनी २६,२३६ मताधिक्य मिळवले. इतर आकडेवारी बाबत सांगायचे झालेच तर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक (Vaibhav Naik) हे सुमारे १५ हजार मतांनी विजयी झाले होते. त्या मताधिक्यासोबत यावेळी राणे यांनी साधारणतः ४१,००० पार केले आहे. याचा अर्थ मालवण व कुडाळचे मताधिक्य लक्षणीय ठरले आहे.

मालवण व कुडाळ मतदार संघाच्या मतदारांचा कौल हा नारायण राणे त्यांच्या बाजूनेच होता हे निकालाअंती स्पष्ट झाले. मतदार संघातील संपूर्ण चित्र पाहता इलेक्शन बूथवर (Election Booth) शहर व तालुका हा राणे यांच्या कामगिरी संदर्भात खुश असल्याचे जाणवले. इथे महायुतीचा (Mahayuti)  विजय झाल्याचे आपणाला पाहायला मिळाले.

२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या मतदारांनी मालवण शहराने नारायण राणे (Narayan Rane) यांना एकूण ३,९६७, तर राऊत यांना ३,६३६ मतदान मिळाले. यात राणे यांनी आपली ताकद अजूनही मजबूत आहे हे दाखवले होते. कुडाळ येथे त्यांना १५ जिल्हापरिषद मतदार संघानी मताधिक्या मिळवून दिले. तसेच त्यांना दोन्हीही शहरातून आघाडी मिळाली.

मालवण तालुक्यातील नारायण राणे यांच्यासाठीचे मतदान

१. देवबाग जिल्हापरिषद – २,४२५

२. पेंडूर – २,२०१

३. सुकळवाड – १,७१६

४. मसूर – १,५९८

५. आचारा – १,५९३

६. अळवाडी मालडी – ९५५

मालवण तालुक्यातील ठाकरे (Thackery)  गटाच्या अखत्यारीत येणाऱ्या वायरी भूतनाथ हा जिल्हापरिषद मतदारसंघात यंदा राणे यांच्याच बाजूने होता. त्याच प्रमाणे नेहमी ठाकरे यांच्या गटाच्या पाठीशी असणारे वायंगणी, तोंडवळी-तळाशिल या गावांतही राणे यांना भरघोस प्रतिसाद मिळाला. या निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने हे चित्र महत्वपूर्ण राहिले. मालवण शहरात भाजपाला १,२५७ मते मिळाली. तर शहरातील एकाच बूथवर विनायक राऊत यांना ९४ मताधिक्य मिळाले. विनायक राऊतांसोबत जनतेने आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनाही नाकारले.

कुडाळ व माणगाव तालुक्यातील नारायण राणे यांचे मताधिक्य –

१. आंब्रड जिल्हा परिषद – ९९६

२. ओरोस जिल्हा परिषद – १,४०६

३. वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद – १,३०६

४. पावशी जिल्हा परिषद – १२,१५०

५. नेरुर जिल्हा परिषद -१,८३३

६. घावणळे जिल्हा परिषद – ६१३

७. पिंगुळी जिल्हा परिषद – १,४७२

८.माणगाव जिल्हा परिषद – १,७८७

९. तोंडोली जिल्हा परिषद – २,३२९

१०. कुडाळ जिल्हा परिषद – १,४६१

वैभव नाईक यांच्यापेक्षा भाजप नेते निलेश राणे हे कुडाळ मध्ये अग्रेसर ठरले.

हे ही वाचा:

तेव्हाच तुम्ही राजीनामा देऊन ‘मोकळं’ व्हायला हवं होतं…KIRAN MANE यांचे टीकास्त्र कोणावर?

केंद्रात सत्तास्थापनेत NDA च्या घटक पक्षांना मिळणार जागा..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss