नारायण राणेंचा हल्लाबोल, संजय राऊत ठाकरेंचा चपलेने मार खाणार

महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय नेते हे रोज एकमेकांवर टीका करताना दिसतात. यातच काल भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यातीळ वादाला पुन्हा एकदा सुरुवात हि झाली आहे.

नारायण राणेंचा हल्लाबोल, संजय राऊत ठाकरेंचा चपलेने मार खाणार

महाराष्ट्रातील राजकारणारातील राजकीय नेतेमंडळी हे रोज एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यातच काल भाजपचे मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील नव्या वादाला पुन्हा एकदा सुरुवात ही झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लवकर जेलवारी घडवणार असल्याच विधान नारायण राणेंनी केले होते. त्यांना प्रतिउत्तर देत राणेंची सर्व आर्थिक प्रकरण बाहेर काढली, तर ५० वर्ष सुटणार नाहीत, असा जोरदार हल्लाबोल देखील राऊतांनी केला. हा वाद आता हळू हळू वाढत चालला आहे. आता पुन्हा एकदा नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसेच लवकरच उद्धव ठाकरेंना भेटणार असा एक गौप्यस्फोट देखील राणेंनी केला आहे.

नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी ते म्हणाले, एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. त्यांना अश्या काही गोष्टी सांगायच्या आहेत कि त्यामुळे खासदार संजय राऊत हे नक्कीच चपलेने मार खाणार आहे. तसेच मी जेव्हा खासदार होतो तेव्हा संसदेत असताना संजय राऊत माझ्या बाजूला बसायचे आणि तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे काही सांगायचे ते मी लवकरच उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. मी जेव्हा ते सांगेल तेव्हा रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याला चपलेने नाही मारलं तर बघा…”, असं देखील नारायण राणे म्हणाले आहेत. संजय राऊत हा मातोश्रीला संपवणारा व्यक्ती आहे. त्याने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे असा आरोप देखील राणेंनी केला आहे. हा मातोश्रीला सुरुंग लावणारा विष आहे. तो ज्याच्या अंगावर हात टाकेल तो खांदा गळालाच समजा, असं देखील नारायण राणे म्हणाले आहेत.

तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना एकटं फिरण्याचे आव्हान केलं होत. त्यावर नारायण राणेंनी संजय राऊतांच आव्हान स्वीकारलं आहे. तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते; असं खुलं आव्हानच नारायण राणे यांनी राऊतांना दिलं आहे. पुढे ते म्हणाले, मी काही सरकारकडे संरक्षण मागितलं नाही. १९९० सालापासून मला संरक्षण आहे. मी ज्यांच्या विरोधात लढलो. त्यात बाहेरचे लोक होते. त्यांच्या विरोधात लढलो म्हणू मला ९० सालापासून मला संरक्षण दिलं आहे. मला पोलिसांनी जबरदस्तीने संरक्षण दिलं आहे, असं देखील राणे म्हणाले. पण एक दिसू मी सरंक्षण सोडून राऊत समोर येईल असं देखील राणे म्हणाले आहेत. यामुळे आता नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे ही वाचा:

Sania Mirza टेनिसमधून होणार निवृत्त, दुबईत खेळणार शेवटची टेनिस चॅम्पिअनशिप

मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या भावामध्ये वाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version