spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फडणवीसांच्या समोर नारायण राणेंचं मोठं विधान म्हणाले, भाजपत आलो हीच माझी अडचण,कारण …

काल आंगणेवाडीतील जत्रेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात भाजपकडून शक्तिप्रदर्शन अरण्यात आले. भाजपचे सर्व नेते मंडळी या कार्क्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केलं? असा सवालही राणेंनी यावेळी विचारला. त्याच बरोबर नारायण राणे यांनी पुढे सांगितल की “भाजपत आलो हीच माझी अडचण”, अस विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या आधी अनेक वेळा भाजप आणि मुख्यतः भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. तर काल भारतीय जनता पक्षाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंगणेवाडी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. यावेळेस भाजपच्या अनेक नेत्यांनी या कार्यक्रमांमध्ये भाषण सुद्धा केलं होत. पण या वेळेस भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत जाते भाजपत आहेत म्हणून ते उद्धव ठाकरे यांच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत असे सांगत भाजपत येन हे राणेंसाठी अडचण झाले आहे असे देखील नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या समोर सांगितलं. यावेलेस बोलताना नारायण राणे म्हणाले की ” “शिवसेना वाढायला. घडायला आणि सत्तेत यायला… कोकणाने आधार दिला. नारायण राणेंनी आधार दिला, असं मी म्हणत नाही. पण महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात वणवण फिरणारा कोकणी माणूसच होता. मग उद्धवा अडीच वर्षात काय केलंस रे बाबा? केवळ दोन वेळा मासे खायला आलास.”असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

नारायण राणे हे त्यांच्या भाषणात पुढे म्हणाले की “माझ्यावर टीका केली जात आहे. मी सहन करतोय तोपर्यंत ठीकय. एकदा का मी बोलायला लागलो तर सगळंच बाहेर काढेन. त्यांना इथं राहताही येणार नाही. मी भाजपमध्ये आलो हीच अडचण झाली. कारण इथं सहनशील आणि शांत विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळे आपणंही तसं दाखवायला पाहिजे म्हणून शांत आहे” असे नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आहे.

Latest Posts

Don't Miss