शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादात नारायण राणेंची एंट्री

मुंबईमधील दादर येथील प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जनाच्या दिवशी शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. काल दि. ११ सप्टेंबर रोज देखील हा वाद अजून मोठ्या प्रमाणात चिघळला होता.

शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादात नारायण राणेंची एंट्री

नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबईमधील दादर येथील प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जनाच्या दिवशी शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. काल दि. ११ सप्टेंबर रोज देखील हा वाद अजून मोठ्या प्रमाणात चिघळला होता. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) वादात आता भाजप ज्येष्ठ नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची एन्ट्री झाली आहे. नारायण राणे यांनी आज आमदार सदा सरवणकर यांच्या घरी जाऊन भेट घेतली. मुंबईतील प्रभादेवी इथे झालेल्या राड्यानंतर (Prabhadevi Rada) नारायण राणे हे दुपारी बाराच्या सुमारास सदा सरवणकर यांच्या दादरमधील निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. स्वत: सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे नारायण राणेंच्या स्वागतासाठी घराखाली उभे होते.

दरम्यान सदा सरवणकर यांच्या भेटीनंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणे म्हणाले की, आमदार सदा सरवणकर हे माझे मित्र आहेत, काल जो प्रकार घडला, त्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या हेतूने आलो. आमची युती आहे. एकमेकांना मदत करणं हा युतीधर्म आहे. त्या पार्श्वभूमीवर मी विचारपूस करण्यासाठी आलोय.” “तक्रार दिलीय त्याची पोलीस चौकशी करतील. फायरिंग झालंय असं म्हणता, तर आवाज आला का?” असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला. मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचं मार्केटिंग करण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही. पण असले हल्ले-बिल्ले करु नका, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? परवानगी घ्यावी लागेल. पक्षाचा प्रश्न नाही, मित्र आहे म्हणून आलो, असंही राणे म्हणाले.

तसेच पुढे राणे म्हणाले, आमची युती आहे, युती धर्मानुसार एकमेकांच्या मागे दोघांची ताकद असतेच. ५० जण एकावर हल्ला करायला आले, त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो, असंही राणेंनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

गणेशोत्‍सवाची सांगता होत असतानाच शनिवारी रात्री शिवसेनेचा गड मानल्‍या जाणाऱ्या दादर प्रभादेवी विभागात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. दोन्ही गटांनी परस्‍परविरोधी आरोप केले असून, याप्रकरणी ठाकरे गटाच्या पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती, तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला असून त्‍यांना अटक करण्याची मागणी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केली आहे. “सरकारपुरस्‍कृत गुंडागर्दी जर अशीच चालू राहिली तर जुनी शिवसेना काय आहे, हे आम्‍ही दाखवून देऊ,” असा इशाराही अरविंद सावंत यांनी दिला आहे. आमदार सदा सरवणकर यांनी हा प्रकार म्‍हणजे जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्‍न असल्‍याचे म्‍हटले आहे; मात्र त्यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

दादरमधील वादानंतर उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचे कौतुक

शिवसेना व शिंदे गटातील वादानंतर आज दादर पोलीस स्टेशनबाहेर राडा

प्रभादेवीत मध्यरात्री शिवसेना-शिंदे गटात जोरदार वाद, सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version