spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नरेंद्र मोदी एक प्रभावशाली व्यक्तिमहत्व, वाचा प्रधान मंत्रींच्या संघर्षाचा प्रवास

भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचे पंतप्रधान होऊन यंदा ८ वर्षे झाली आहेत. भाजपनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. मे २०१४ मध्ये मोदींनी कार्यभार स्वीकारल्या तिथ पासून ते आता पर्यंत नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हितासाठी अनेक योजना आखल्या अगदी ‘स्वच्छ भारत अभियान’ पासून ते हर घर तिरंगा पर्यंत. अशा प्रभावशाली व्यक्तीमहत्वाचा उद्या (१७ सप्टेंबर) जन्मदिवस. जाणून घ्या नरेंद्र मोदींन विषयी महत्वपूर्ण माहिती.

नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ डिसेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव हिराबेन तर वडिलांचे नाव दामोदरदास मुलचंद मोदी असे होते. नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिति फार चांगली नव्हती. त्यांचे वडील एक लहान व्यापारी होते. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. यांच्या आई एक गृहिणी होत्या. कुटुंबाला मदत म्हणून नरेंद्र मोदी यांनी लहान असताना रेल्वे स्टेशन वर चहा विकायचे. मोदी यांनी आपल्या लहान वयातच अनेक घरगुती समस्याचा सामना केला. परंतु त्यांनी आपल्या जिद्दीने सर्व आपले आयुष्याचा आलेख उंच्चावर ठेवला.

हेही वाचा : 

PM Modi Birthday : ‘५६ इंच’ थाळी संपवा आणि जिंका ‘साडे आठ लाख’ रुपयांचं बक्षीस

नरेंद्र मोदी यांनी १९६७ मध्ये आपले शिक्षण वडनगर मधील स्थानीय विद्यालयातून पूर्ण केले. कुटुंबाची आर्थिक स्थिति चांगली नसल्याने त्यांनी शिक्षण सोडून दिले व ते आणि भारत भ्रमण करायला निघून गेले. हिमालय व भारतातील इतर ठिकाणी भ्रमण करून त्यांनी अनेक नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या.

या नंतर सन १९७८ मध्ये त्यांनी उच्च शिक्षणासाठी दिल्ली यूनिवर्सिटी व त्यानंतर अहमदाबाद यूनिवर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी राजनीति विज्ञानात पदवी मिळवली.नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक करियर ची सुरुवात कॉलेज मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरू झाली. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभाग घेऊन राष्ट्रीय स्वयम सेवक संघाचे प्रचारक म्हणून काम सुरू केले.

सन १९७५-७७ दरम्यान लावण्यात आलेल्या आपत्काळ मध्ये आरएसएस वर बंदी लावण्यात आली या मुळे त्यांना बराच काळ लपून राहावे लागले. आपत्काळच्या विरोधात नरेंद्र मोदी सक्रिय पणे उभे होते. त्या काळात सरकारचा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या.

सन १९८५ मध्ये नरेंद्र मोदी हे आरएसएस द्वारे भारतीय जनता पार्टी मध्ये सामील झाले. मोदी हे त्याकाळी एक कुशल नेते होते. बीजेपी मध्ये त्यांच्या प्रवेशामुळे पार्टी ने जोरदार वाढ मिळवली. १९८७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा अहमदाबाद नगर पालिकेची निवडणूक लढवली. व यात विजय पण मिळवली. पार्टीच्या अनेक कार्यामध्ये मदत केल्याने त्यांचे नाव खूप वाढत गेले. सन १९९५ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने १२१ सीट मिळवले. ज्यामुळे गुजरात मध्ये पहिल्यांदा भाजपा ची सरकार बनली. परंतु भाजपा सरकार काही काळच सत्तेत राहिली व सप्टेंबेर १९९६ मध्ये त्यांचे सरकार समाप्त झाले.

Rain Alert : राज्यभर मुसळधार पाऊस, तर पुढील ३ ते ४ तास मुंबईकरांसाठी सतर्कतेचे

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदासाठी निवडणुक लढवली. या निवडणुकीत त्यांनी देशात जवळपास ४३७ रॅली केल्या, निवडून येण्यासाठी ज्या प्रकारे मोदींनी प्रचार केला याचे दाखले जगभरात दिले जातात. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वर प्रभावित होऊन त्यांना आपला प्रधान मंत्री निवडून देणीसाठी भरपूर मत दिले. व २०१४ च्या निवडणुकीत भाजपा प्रचंड बहुमतांनी विजय झाली. व नरेंद्र मोदी भारताचे प्रधान मंत्रीच्या रूपात एक नवीन चेहरा बनून गेले.

प्रधान मंत्री च्या रूपात नरेंद्र मोदी यांनी भारतात खूप विकास कार्य केलीत. त्यांनी अनेक विदेश दौरे करून जगातील इतर देशाना भारताच्या बाजूने वळवले. भारतात अनेक विदेशी कंपन्याचे निवेश होऊ लागले. भारतात एक पद्धतीने डिजिटल क्रांति घडून आली. अनेक क्षेत्रात भारताने प्रगती केली.

पुण्यात आयोजित केलं अजब ‘सेक्स तंत्र’ प्रशिक्षण शिबीर,हिंदू महासभेचा विरोध

Latest Posts

Don't Miss