spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जी२० परिषदेमध्ये नरेंद्र मोदींनी युवकांना सहभागी होण्याचं केलं आव्हान

पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) आज ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांचं लक्ष जी२० वर होतं. भारत २०२३ च्या जी२० शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहे. पीएम मोदी म्हणाले, ‘मन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप-खूप स्वागत आहे. हा कार्यक्रम ९५ वा भाग आहे आणि आम्ही हळूहळू शतकाकडं वाटचाल करत आहोत. काही दिवसांपूर्वी मला जी-२० लोगो आणि भारताच्या अध्यक्षपदाची वेबसाइट लॉन्च करण्याचं सौभाग्य मिळालं.’

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील विणकर येल्दी हरिप्रसाद गरू यांचा विशेष उल्लेख केला. येल्दी हरिप्रसाद गरू यांनी हातांनी विणलेला जी-२० लोगो पंतप्रधान मोदी यांना भेट म्हणून पाठवला आहे. येल्दी यांना विणकामाचा वारसा त्याच्या वडिलांकडून मिळाला असून त्यांनी तो चांगल्या रितीने सांभाळल्या आहे. असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी जी२० शिखर परिषदेचा लोगो पाठवल्याबद्दल येल्दी यांचे आभार मानले.

२०२३ मध्ये होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे. याभारतात २०२३ मधील जी२० परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. १ डिसेंबरपासून भारत औपचारिकपणे जी -२० चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. नुकत्याच इंडोनेशियामध्ये १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी १७ वी शिखर परिषद पार पडली आहे. या शिखर परिषदेच्या समारोप सत्रात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी प्रतीकात्मकपणे जी २० चं अध्यक्षपद भारताकडे म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्याकडे सुपूर्द केलं आहे. जी-२० शिखर संमेलन हा जगातील वीस मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समूह आहे. हा समूह जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा आणि स्थिती ठरवतो. जी २० शिखर परिषदेदरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेचा अजेंडा निश्चित करण्यात येतो. यामध्ये जगातील आघाडीची अर्थव्यवस्था असणारे १९ देश आणि युरोपियन संघाचा समावेश आहे. जगातील ८५ टक्के व्यवसाय फक्त जी २० सदस्य देशांमध्ये केला जातो. जी -२० देशांमध्ये भारत, ब्रिटन, अमेरिका, चीन, फ्रान्स, जर्मनी, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की आणि युरोपीय संघ यांचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

अमिताभ बच्चन यांच्या आठवणीतले विक्रम गोखलेंची, ‘ते आमच्या आयुष्यात आले, त्यांची भूमिका बजावली आणि निघून गेले’

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संभाजीराजे पुन्हा आक्रमक

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss