नरेंद्र मोदींनी स्वपक्षातही नेतृत्व संपवलेलं आहे, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

नरेंद्र मोदींनी स्वपक्षातही नेतृत्व संपवलेलं आहे, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात युती कधी होणार असा प्रश्न सर्वांचं पडला होता. तर आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्राची जनता वाट पाहत होती ती म्हणजे आमच्या युतीची त्या युतीची घोषणाआज मी करत आहे असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी सांगितलं आहे. तर प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांवर जोर्दारब हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) स्वपक्षातील नेतृत्त संपवल्याचा हल्लाबोल वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले की, सध्या राष्ट्रीय नेतृत्व करणारं एकही राजकीय नेतृत्त्व नसल्याचे ते म्हणाले. ईडीच्या माध्यमातून देशातलं राजकीय नेतृत्त्व संपण्याचा घाट घातला जातोय असा आरोपही आंबेडकरांनी यावेळी केला. आज ईडीच्या मार्फत पॉलिटिकल लीडरशिपवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. मात्र, कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसून, नरेंद्र मोदींचासुद्धा एक दिवस अंत पक्षात होणार असल्याचे म्हणत मोदींनीच त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली असल्याचे आंबेडकर म्हणाले. फक्त फाईली उचलून घेऊन जायचं आमचं काम असल्याचे त्यांच्यातले अनेक मंत्री म्हणतात असेही आंबेडकरांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवारांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यासोबत शेतातील भांडण नाहीत, तर त्यांच्यासोबत मुद्याची भांडण आहेत. शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमची युती स्वीकारतील अशी अपेक्षाही आंबेडकरांनी यावेळी व्यक्ती केली.

हे ही वाचा:

निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार, चंद्रकांत पाटील

Balsaheb Thackeray Jayanti 2023, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील अखेरचा ‘राजकीय संवाद’ काय होता हे तुम्हाला माहित आहे का ? घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version