spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नरेंद्र मोदी एकनाथ शिंदेंना देणार धनुष्यबाण ?

सध्या महाराष्ट्रामधलं राजकारण चांगलाच तापल्याच दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये (Shiv Sena) फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणती ? आणि धनुष्यबाण कोणाचा ? या साठी मोठा वाद होतांना दिसत आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंब दौऱ्यावर येणार आहेत. आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाणाची प्रतिकृती देण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे मुंबई विमानतळावर थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह (symbol) आणि नाव गोठवलेलं आहे. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी आमचीच शिवसेना ही खरी शिवसेना, असा दावा केलाय. दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे ट्रकच्या ट्रक भरुन पुरावे सादर केलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदेंना धनुष्यबाण देऊन काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ‘एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना’ असा मेसेज कार्यकर्त्यांना देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

काहीच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होतील. मुंबईतल्या बीकेसी मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यातले आमदार, खासदार, मंत्री आणि बडे नेते बीकेसी मैदानामध्ये दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

PM Modi Mumbai Visit Live, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, जाणून घ्या प्रत्येक अपडेट

पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंनी लगावला टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss