नरेंद्र मोदींचा महारष्ट्रामधल्या विरोधकांना मारला टोला

नरेंद्र मोदींचा महारष्ट्रामधल्या विरोधकांना मारला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारचं कौतुक केलं असून डबल इंजिन सरकार वेगाने काम करत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) तसंच इतर विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी जाहीर कार्यक्रमात त्यांनी भाषण केलं. नरेंद्र मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. विकासकामांचं उद्धाटन करताना आपल्या आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

‘एका विकृतीपासून सावधान करतो, शॉर्टकटचे राजकारण करू नका. राजकीय स्वार्थासाठी देशाचे पैसे लुटले जात आहे. ही विकृती करदात्यांचे पैसे लुटण्याची आहे. शॉर्टकट वापरणारे राजकीय पक्ष, नेते हे देशाच्या करदात्याचे शत्रू आहे. फक्त खोटी आश्वासनं देऊन त्यांना फक्त सरकार सरकारमध्ये यायचं असतं. असे राजकीय पक्ष देश कधीच बनवू शकत नाही’ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना फटकारून काढलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये (Nagpur) समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी मोदींना विरोधकांवर निशाणा साधला.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पायाभूत सुविधांची उभारणी करताना मानवी संवेदनांचा विचार झाला पाहिजे, असे सांगितले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोद यांनी महाराष्ट्रातील गोसीखुर्द धरण प्रकल्पाचे उदाहरण दिले. समृद्धी महामार्गासह आज उद्घाटन झालेल्या ११ प्रकल्पांना एकप्रकारचा ह्युमन टच आहे. पण अनेकदा पायाभूत सुविधांची उभारण करताना मानवी संवेदनांचा विचार केला जात नाही. त्यामुळे जनतेला मोठे नुकसान सोसावे लागते. महाराष्ट्रातील गोसीखुर्द प्रकल्प हे त्याचे उदाहरण आहे. या धरणाची पायाभरणी ३० ते ३५ वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी या धरणाच्या उभारणीसाठी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. पण असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे या धरणाचे काम अनेक वर्षे रखडले. आता या धरणाचा खर्च १८ हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आता ३० वर्षानंतर हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या स्थितीत आहे. पण महाराष्ट्रात २०१७ पासून डबल इंजिन सरकार आल्यापासून या धरणाचे काम वेगाने झाले. संबंधित समस्या निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रासाठी डबल इंजिन सरकार किती फायदेशीर आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला.

हे ही वाचा : 

Youtuber Armaan Malik युट्युबर अरमान मलिकच्या दोन बायका एकाच वेळी गरोदर, बेबी बंपचा फोटो शेअर करत केला खुलासा

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का

७५,००० कोटी रुपयांचे ‘ग्रीन एक्स्प्रेस हायवे’ पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली होणार तयार, नितीन गडकरींची नवी घोषणा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version