spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयावर नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितलं की मिळालेल्या नावावर आम्ही खुश आहोत, आम्हाला जे नाव पाहिजे होतं तेच नाव आम्हाला मिळाल्याचं शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी सांगितलं. तर चिन्हा बाबत बोलतांना नरेश म्हस्के यांनी सांगितलं, आम्ही आमच्या मुख्य नेते एकनाथ शिंदे हे जे चिन्ह देतील ते आमच्या साठी अंतिम असेल. तर शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांनी सांगितले की आम्ही मिळालेल्या नावावर समाधानी आहोत. आता आम्हाला कुठलं ही चिन्ह मिळालं तरी चालेल, आम्हीच खरी शिवसेना आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.

दोन्ही गटांच्या नावातील दुसरा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. तर त्यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने हे देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचं चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे.

शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं आहे.

हे ही वाचा:

मोठी बातमी ! शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर उद्धव ठाकरेंचं चिन्ह ‘मशाल’

आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नका; शिंदे गटाची कोर्टात धाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss