Sanjay Raut पत्राचाळीतले आरोपी, त्यांना पोलिसांवर बोलण्याचा अधिकार नाही: Naresh Mhaske

Sanjay Raut पत्राचाळीतले आरोपी, त्यांना पोलिसांवर बोलण्याचा अधिकार नाही: Naresh Mhaske

Akshay Shinde Encouter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाल्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी सरकार आणि पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे. तसेच ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर जात धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन देखील केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर चांगलीच टीका केली. संजय राऊत यांनी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून राज्य सरकारसह पोलिसांवर आगपाखड केली आहे. त्याला प्रत्युत्तर देत नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी “संजय राऊत हे पत्रा चाळीतले आरोपी असून त्यांना पोलिसांवर बोलण्याचा अधिकार नाही,” असे म्हंटले आहे.

नरेश म्हस्के यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा एन्काऊंटर नसून स्वरक्षणाकरता दिलेले प्रत्युत्तर आहे. पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही आहे का? विरोधी पक्षाला क्रूरकर्म्याचा पुळका आला आहे. या विरोधी पक्षवाल्यांनी बाहेरुन लोकं घेवून जावून बदलापूरात आंदोलन केले, महाराष्ट्र बंदची हाक दिली. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले. मात्र आज तोच क्रूरकर्मा यांना प्रिय झाला आहे. आज नियतीने न्याय दिला आहे. डबल ढोलकी, दुतोंडी सापा सारखे विरोधक वागतात आणि सरकारवर टिका करतात. महिलेकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती जर असे प्रकार घडले तर धर्मवीर आनंद दिघे त्यांच्या स्टाईलने त्याला उत्तर द्यायचे. त्याच आनंद दिघे यांच्या शिष्याच्या काळात पिडित महिलेला न्याय मिळाला आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी नरेश म्हस्के संजय राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले, “हे संजय राऊत पत्रा चाळीतले आरोपी आहेत. हे जामीनावर सुटले आहेत. त्यांना पोलिसांवर बोलण्याचा अधिकार नाही. या संजय राऊतांनी महिलेला शिव्या दिल्या आहेत. ते काय सरकारचा एन्काऊंटर करणार? जनता सरकार सोबत आहे. पोलिसांच्या पाठी जनता आहे, असा शब्द आम्ही पोलिसांना दिला आहे.”

मनसुख हिरेनची हत्या विरोधक विसरले का ?

नरेश म्हस्के पुढे म्हणाले,”मनसुख हिरेनची हत्या विरोधक विसरले का ? सचिन वाझे संजय राऊत यांचा पीए होता. निलंबित वाझेला हे लोकं सत्तेत आले तेव्हा परत पोलिस सेवेत घेतले. तेव्हा कोण होते मुख्यमंत्री? कोण होते उपमुख्यमंत्री ? तेव्हा का नाही विरोध केला ? त्याच सचिन वाझेचे त्यावेळी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले होते. संजय राऊत यांनी तेलंगणात पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे सामनातून कौतुक केले होते. पण महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक करता येत नाही यांना,” अश्या शब्दांत त्यांनी टीका केली.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर… पोलिसांची पहिली पत्रकार परिषद म्हणाले…

Akshay Shinde Encountar: अक्षय शिंदे याला संपवले म्हणून हे प्रकरण संपत नाही, या प्रकरणात कोणाला वाचवलं जातय? Sushma Andhare यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version