Nashik Gram Panchayat Election 2022 नाशिक जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात, तर ७ ग्रामपंचायत बिनविरोध

राज्यभरात ग्रामपंचायतीची रणधुमाळी (Maharashtra Gram Panchayat Election 2022) सुरू असून आज नाशिक जिल्ह्यातही (NashikGram Panchayat Election) मतदान प्रक्रिया राबवली जात आहे.

Nashik Gram Panchayat Election 2022 नाशिक जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात, तर ७ ग्रामपंचायत बिनविरोध

Nashik Gram Panchayat Election 2022 : राज्यभरात ग्रामपंचायतीची रणधुमाळी (Maharashtra Gram Panchayat Election 2022) सुरू असून आज नाशिक जिल्ह्यातही (NashikGram Panchayat Election) मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी २, कळवण १५, चांदवड ३४, त्र्यंबकेश्वर १, दिंडोरी ६, देवळा १३, नांदगाव १४, नाशिक १३, निफाड २०, पेठ ०१, बागलाण ३८, येवला ७, सिन्नर १२ आणि मालेगावच्या १३ ग्रामपंचायतींचा मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण १९६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये ७ ग्रामपंचायत बिनविरोध ग्रामपंचायती आहेत. तर १९ बिनविरोध सरपंच, ५७९ बिनविरोध सदस्य आहे. दरम्यान १२९१ जागांवर मतदान होणार आहे. यातील १७७ सरपंचासाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी जिल्ह्यात ७४५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण सदस्य पदासाठी २८९७ तर सरपंच पदासाठी ५७७ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यात सुरगाणा वगळता १४ तालुक्यातील १९६ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. यातील ७ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून १८९ ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे, गिरणारे, एकलहरे या ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत.

पालकमंत्री दादा भुसेंचे मालेगाव, आमदार छगन भुजबळांचा मतदार संघ येवला, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंच्या नांदगाव मध्ये निवडणुका लागल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या खासदार असलेल्या दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघातील ७ तालुक्यात निवडणुका होत आहेत.

बिनविरोध ठरलेल्या ७ ग्रामपंचायती

बागलाण तालुका – किकवारी बु, ढोलबारे, महड.. नाशिक तालुका – कोटमगाव.. चांदवड तालुका – नारायणगाव.. कळवण तालुका – जयपूर.. नांदगाव तालुका – शास्त्रीनगर

हे ही वाचा : 

मोर्चा नॅनो आहे तर तुमचं सरकारही नॅनो, सरकार पडणार असं म्हणतं राऊतांनी केला हल्लाबोल

‘हर हर महादेव’मध्ये स्त्रियांचा बाजार, संभाजीराजेंचा चित्रपटाला विरोध

‘मविआ’च्या महामोर्चासाठी पैसे देऊन गर्दी जमवली, व्हिडीओ शेअर भाजपने केला गंभीर आरोप

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version