spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nashik Padvidhar Election, सत्यजीत तांबेच्या अडचणी वाढणार ?

राज्य शिक्षक सेनेचा सत्यजित तांबे यांना विरोध असल्याची माहिती शिक्षक शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली आहे.

Nashik Padvidhar Election : नाशिक मधील पदवीधर निवडणुकांमध्ये आता दिवसेंदिवसे अनेक अडचणी या वाढत आहेत. सत्यजीत तांबे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र हे दिसून येत आहे. याच कारण म्हणजे, राज्य शिक्षक सेनेचा सत्यजित तांबे यांना विरोध असल्याची माहिती शिक्षक शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे आता कदाचित सत्यजीत तांबे हे अडचणीत सापडण्याची शक्यता देखील आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना आता मोठा ट्वीस्ट सर्वांना पाहायला मिळाला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. परंतु शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे सर्वांच्या भुवया या उंचावल्या आहेत. परंतु त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पक्ष पाठिंबा देणार नाही अशी रोखठोक भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole News) यांनी घेतली आहे. सुरुवातीला नाशिक पदवीधर निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी अर्ज जाहीर केल्यानंतर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यामुळे राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेले दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पिता-पुत्रांना चांगलेच धारेवर धरले आहे. आता सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने विरोध केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे यांच्या अडचणीत तर वाढ झालीच आहे, परंतु अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक पदवीधर निवडणूक मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य शिक्षक सेनेचा सत्यजित तांबे यांना विरोध असल्याची माहिती शिक्षक शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली आहे. सत्यजित तांबेंच्या या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देत शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय चव्हाण म्हणाले कि, सुधीर तांबे जर उमेदवारीसाठी उभे असते तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता. मात्र, सुधीर तांबे उमेदवार नाही आहेत आणि त्यामुळे सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला जाणार नाही. ते पुढे म्हणाले, सत्यजित तांबे हे मविआकडून (महाविकास आघडी) निवडणुकीसाठी उभे राहत नसल्यामुळे त्यांना विरोध केला जात आहे. टीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार असून १६ तारखेला या प्रकरणासंबंधीची भूमिका ते स्पष्ट करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सत्यजित तांबे हे एक बंडखोर उमेदवार आहेत आणि ते भाजपचे उमेदवार आहेत हे एक ओपन सिक्रेट आहे, असा आरोप महाराष्ट्र शिक्षण सेनेने केला आहे. यावेळी बोलताना, पदवीधर मतदार संघ हा कुणाचा सातबारा नाही, कि बापानंतर मुलाने निवडणुकीला उभे राहावे, असा जबरदस्त टोलाही संजय चव्हाण यांनी सत्यजित तांबेंना लगावला आहे.

या प्रकरणात आता मविआने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिकमधून काँग्रेसऐवजी शिवसेना आणि राष्ट्रवादी जागा लढवण्याची शक्यता असल्याचे आता बोलले जात आहे. तसेच कॉग्रेससाठी नागपूरची जागा सोडणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या अडचणीत वाढ करण्याचा मविआचा हा प्लान आहे का?, असा सवाल आता निर्माण होत आहे.

हे ही वाचा:

भारत जोडोला तात्पुरती स्थगिती, बड्या नेत्याच्या मुत्यूने काँग्रेसमध्ये व्यक्त केली हळहळ

ती जुनी गोष्ट झाली, बृजभूषण सिंग वरमले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss