राहुल गांधींचा ईडीला थेट प्रश्न

त्यांना ईडीने सोमवारी १३ जून ला बोलावलं होतं. त्यावेळी राहुल गांधी ईडीच्या चौकशीसाठी कार्यालयात पोहचले.

राहुल गांधींचा ईडीला थेट प्रश्न

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांना ईडीच्या चौकशी साठी बोलवण्यात आले. राहुल गांधी काही कारणांमुळे परदेशात असल्यामुळे त्यांना येणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना ईडीने सोमवारी १३ जून ला बोलावलं होतं. त्यावेळी राहुल गांधी ईडीच्या चौकशीसाठी कार्यालयात पोहचले. तब्बल साडे आठ तास राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली.

फक्त काँग्रेसच्या नेत्यांच ईडीच्या कार्यालयात का बोलवलं जातं ? इथे फक्त काँग्रेसच्या नेत्यांचीच चौकशी केली जाते की तुम्हीं दुसऱ्यांनाही बोलवता ? असा थेट सवाल राहुल गांधीनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिले नव्हते. सोमवारी सकाळी चौकशी करताना सुरुवातीला त्यांची ३ तास चौकशी करण्यात आली.

त्यानंतर ब्रेक दरम्यान राहुल गांधी सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले तिथून आल्यानंतर पुन्हा ते ईडीच्या कार्यालयात आले. यावेळी पुन्हा एकदा त्यांची चौकशी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात सलग साडे पाच तास चौकशी करण्यात आली. भारतामध्ये तुमच्या हक्कांची संपत्ती कुठे कुठे आहे ? कोणत्या बँकेचे खाते आहे ? परदेशात बँकेचे खाते आहे ? का आणि खात्यात किती रक्कम आहे ? यंग इंडियनशी कसा संबंध झाला असे अनेक प्रश्न ईडी अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना विचारले.

Exit mobile version