चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे नेते एका मागून एक वादग्रस्त वक्तव्य करत आहे आणि याचे पडसाद आपण आधीही पहिले आणि आता सुद्धा पाहत आहोत. आता भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सुद्धा वादग्रस्त वक्तव्याच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले (Mahatma Phule), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि कर्मवीर भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. फुले, आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, अशा आशयाचं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं. या विधानानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चंद्रकांत पाटील यांचा निषेद व्यक्त केला जात आहे.

पुणे (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) कडून कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी पैठणमध्ये केलं होतं. याआधी वक्तव्याच्या निषेधार्थ पाटील यांच्या विरोधात त्यांचे फोटो विद्रूप (ugly) करून पुण्यात काही ठिकाणी फ्लेक्स देखील लावण्यात आले होते. पाटील यांच्या विधानामुळे रोष वाढताना दिसत असून अनेक ठिकाणी पाटील यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे.

आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा (A case of atrocity should be registered), यासाठी सह पोलिस आयुक्त (Joint Commissioner of Police) यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत.

तर औरंगाबादमध्ये (Aurangabad) वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan) च्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. शहरातील गोपालटी परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. अचानक कार्यकर्ते आल्याने काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, आंदोलकांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.

हे ही वाचा : 

समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर अजित पवारांची जोरदार टीका

ईशान किशनने तोडला एक दिवसीय क्रिकेटचा सर्वात मोठा विक्रम

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version