वेदांत फॉक्सकॉन प्रकणावरून पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

वेदांत फॉक्सकॉन प्रकणावरून पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मध्ये होणार वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये हलवण्यात आला. त्या नंतर विरोधी पक्ष नेत्यांनी सरकार विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आज पुण्यमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून वेदांत फॉक्सकॉन प्रकणावरून राज्य सरकार विरोधात निषेद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दिसत आहे. आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी कडून शिंदे फडणवीस सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात येत आहे.

आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी महाराष्ट्र मध्ये वेदांत फॉक्सकॉन प्रकरणात आक्रमक होताना दिसत आहे. तर, पुण्यात राष्ट्रवादी कडून वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महारष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्या मुले महाराष्ट्र सरकार विरोधात अनोख्या पद्धीतीने निषेद व्यक्त केला जात आहे. अनेक राष्टवादी काँग्रेसचे पदाधिकारी बूट पोलिश करतांना आणि रद्दी विकतांना दिसत आहे. महाराष्ट्र सरकार महागाई आणि बेरोजगारीवर काही बोलत नाही आहे, एक दिवस महाराष्ट्राच्या युवकांना हे बूट पोलिश आणि रद्दी विकायला लावणार आहे अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आले आहे.

शिक्षण मंत्र्यांचे मतदारसंघ असलेल्या पुण्यात विद्यार्थ्यांचे ‘अभाविप’ आंदोलन

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कडून पुण्यात आणि मुंबई मध्ये जोरात निषेद आंदोलन करण्यात आले. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र सरकार विरोदहत लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले. त्या नंतर शिवसेना आणि युवासेना सुद्धा वेदांत फॉक्सकॉन प्रकरणात सरकार विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले. युवासेना तर्फे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात अली होती.

हे ही वाचा:

२० सप्टेंबरपासून कोकणकन्या एक्सप्रेस कात टाकणार

नारायण राणेंना मुंबई हाय कोर्टाचा मोठा धक्का

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version