spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, मुंबईत ईडी कार्यालावर मोर्चा

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व माझी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावलेला आहे. त्यानंतर आज सोनिया गांधी यांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहणार आहेत. पण काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेते मंडळी कडून या ईडी चौकशीचा निषेध केला जातोय. मोदी सरकार विरोधात आक्रमक भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व नेते मंडळींनी घेतलेली आहे. आज या ईडी चौकशीचा निषेद करत काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.

राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर मुंबईतील ईडी कार्यालयासमोर काँग्रेसने मोर्चा काढलेला आहे. मुंबई पोलिसांकडून या मोर्चाला अडवण्यात येत आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा संपूर्ण राज्यभरात तैनात करण्यात आलेला आहे. केंद्र सरकार व मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करत या इडी चौकशीचा आंदोलकांकडून निषेध केला जात आहे.

हेही वाचा : 

“सुप्रीम कोर्टात सुद्धा इज्जत गेली”, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सुरू असलेली ही ईडी कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचे काँग्रेसकडून म्हटले जाते. या अगोदर देखील ईडी करून समज बजावण्यात आल्यापासून देशात काँग्रेसकडून ठिकठिकाणी मोर्चे आणि आंदोलन केली जात आहेत. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते नवी दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ एकत्र येणार आहेत काँग्रेस खासदार संसदेत देखील आंदोलन करण्याची शक्यता वर्तवली जातीय. काँग्रेसने इतर विरोधी पक्षांना देखील एकजूट होऊन निषेधार्त सहभागी होण्याची विनंती केली आहे

ईडीने जून सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते मात्र प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी तपास यंत्रणेकडे हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागून घेतला. यावर ईडीने चौकशीची तारीख वाढवली त्यानंतर ईडीने त्यांना 21 जुलैला हजर राहण्याचे सांगितले.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज ईडी चौकशी

Latest Posts

Don't Miss