spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ? अजामीनपात्र वॉरंट!

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana News) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण (Fake Cast Certificate) पुन्हा भोवण्याची चिन्ह आहेत.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana News) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण (Fake Cast Certificate) पुन्हा भोवण्याची चिन्ह आहेत. बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं (Sewri Court) या वॉरंटवर मुलुंड पोलिसांना (Mulund Police) कारवाईचे आदेश जारी केले आहेत.

खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आता शिवडी कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट काढत कारवाई करण्याचे आदेश आदेश दिलेत.

७ नोव्हेंबर रोजी याप्रकरणाची पुढील कारवाई होणार आहे. तोपर्यंत नवनीत राणा यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आता मुलुंड पोलीस नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंटवर नेमकी काय कारवाई करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

नवनीत राणा यांनी आपल्या शपथपत्रामध्ये दिलेलं जात प्रमाणपत्र खोटं आहे, असा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदरराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने जून २०२१ मध्ये नवनीर राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द देखील केलं होतं. शिवाय दोन लाखांचा दंडही ठोठावलेला. मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर जून २०२१ मध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती दिलेली.

दरम्यान, आता नवनीत राणा यांच्या वडिलांविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी फसवणूक करुन जात प्रमाणपत्र मिळवलं असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बोगस दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणांवर आहे. याप्रकरणी नवनीत राणांसह त्यांच्या वडिलांवरही मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नवनीत राणा यांच्यावर आरोप काय?

जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Shivraj Patil : शिवराज पाटलांच्या वक्तव्यावरुन भाजपने केली जहरी टीका

श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, शिवराज पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss