गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन सुषमा अंधारेंकडून नवनीत राणांचा खरपूस समाचार

गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन सुषमा अंधारेंकडून नवनीत राणांचा खरपूस समाचार

काही दिवसांपूर्वी झालेल्या गणेश मूर्ती विसर्जन पद्धती वरून सगळीकडून नवनीत राणा यांच्या वर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. आज शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. “तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेता पण तुम्हाला गणपती विसर्जनाची साधी पद्धत माहिती नाही?”,असा सवाल करत अंधारे यांनी नवनीत राणांवर टीकास्त्र करण्यात आले आहे. धर्माच्या नावावर थयथयाट बंद करा, असा सल्लाही अंधारे यांनी नवनीत राणांना दिला आहे.

नवनीत राणा धर्माच्या नावावर वारंवार अवडंबर माजवत आहेत. त्यांना आरसा दाखवण्याची गरज असल्याचे अंधारे म्हणाल्या आहेत. जर इथर कोणी अशी चूक केलीअसती तर नवनीत राणा यांनी कहर केला असता अश्या शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली. आम्ही तुमच्यासारखे आक्रस्ताळेपणाने बोलत नाही याचा अर्थ आम्हाला धर्म कळत नाही असा होत नाही. धर्माच्या नावावर कोंडी करण्यासाठी धर्म नसतो. सुषमा अंधारेंनी नवनीत राणाला हनुमान चाळीसवरून सुद्धा चांगलेच घेरले. हनुमान चालिसेवरुनही अंधारे यांनी नवनीत राणांना लक्ष्य केले आहे. “तुम्ही हनुमान चालिसेसाठी थयथयाट केलात. मात्र आपल्याला हनुमान चालिसा म्हणता येत नाही. हनुमान चालीसा का म्हटलं जात याचं नेमकं कारण सुद्धा नवनीत राणा यांना माहित नसेल असे म्हणत सुषमा अंधारे यांनी राणावर निशाणा साधला.
नवनीत राणा यांचा व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात वायरल होतांना दिसत आहे. पोलिस स्टेशन मधल्या लव जिहादच प्रकरण गाजल्या नंतर आता नवनीत राणा यांच्या गणपती विसर्जन पद्धितीवर मोठा वाद उपस्थित झाल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा:

एमएएच – सीईटी एलएलबी ५ वर्षाच्या कोर्सचा निकाल झाला जाहीर

या’ दिवशी होणार रामदास कदम यांच्या बालेकिल्यात आदित्य ठाकरेंची सभा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version