spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांचा डोळा…

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचे वातावरण दिसून येत आहे. खरी शिवसेना नक्की कोणाची या वरून अनेक वाद हे सुरु आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचे वातावरण दिसून येत आहे. खरी शिवसेना नक्की कोणाची या वरून अनेक वाद हे सुरु आहेत. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister of the state Eknath Shinde) यांचा डोळा आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या (Shiv Sena leader Aditya Thackeray) मतदारसंघावर असल्याचं दिसून येत आहे.

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी (Worli) हा मतदारसंघ आहे. त्यांच्या या मतदारसंघात आता एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकताना दिसून येत आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवात देखील वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे बॅनर झळकत आहेत. त्यामुळे आधीच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची वरळी मतदारसंघावर नजर असतानाच आता शिंदे गट देखील आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात विशेष रस दाखवत असल्याचं चित्र आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मतदार संघात जागोजागी एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छांचे बॅनर्स (Banners) लावण्यात आले आहेत. विविध देवी मंडळांच्या बाहेर एकनाथ शिंदे यांचे बॅनर आज झळकत आहेत. गणेशोत्सव काळात शिंदे गटाकडून गणेश मंडळांना मोठ्या देणग्या देण्यात आल्या होत्या. आता नवरात्रोत्सवातदेखील एकनाथ शिंदे यांची खास बॅनरबाजी करण्यात येत आहे. वरळीतील अनेक देवींच्या मंडळांसमोर गेट उभारण्यात आले आहे. या गेटवर तसंच आजूबाजूला लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचे फोटो दिसत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असंल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे वरळीत शिवसेनेच्या बॅनरपेक्षा शिंदे यांचेच बॅनर अधिक असल्याचं दिसत आहे. शिवाय या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो आहे.

याआधी गणेशोत्सवात एकनाथ शिंदे यांचे बॅनर वरळी मतदारसंघात झळकले होते. वरळीचा लाडका मार्केटचा राजा इथे श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे पोस्टर लावण्यात आले होते. कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो होते. त्यामुळे वरळीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा शिंदे गटाचा इरादा असल्याचं म्हटलं जात होतं.

 

हे ही वाचा:

Game of thrones : ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सातव्या एपिसोडचा ट्रेलर प्रदर्शित

Navratri 2022 : नवरात्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्वाची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss