spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का; राहत्या घरासह कोट्यवधींची संपत्ती ताब्यात घेणार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक (NCP and former minister of state Nawab Malik) यांना मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक (NCP and former minister of state Nawab Malik) यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटातले आमदार प्रताप सरनाईक यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा नवाब मलिकांकडे वळवला आहे. मलिक यांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला (ED) परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मलिक यांना मोठा धक्का बसला आहे.

नवाब मलिक सध्या न्यायलयीन कोठडीत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ईडीला संपत्ती जप्त करण्यास परवानगी मिळाल्याने मलिक कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. या आधीही मलिकांची बरीच संपत्ती ईडीच्या ताब्यात आहे. मात्र आता मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेला ३ फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील २ फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १४७ एकर शेतजमिनीचा समावेश आहे. मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी कायदेशीर सल्लामसलत करत आहेत.

फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहीण हसना पारकरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत फेब्रुवारी महिन्यामध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक कुटुंबाची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केली होती. अधिनिर्णय प्राधिकरणाने या जप्तीला मंजुरी दिली आहे. या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबीय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी संबंधित आहेत.

आरोप काय?

हसीना पारकर, सलीम पटेल, १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची ३ एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने १९९९ मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. या द्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केली असल्याचा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा :

सुषमा अंधारे यांना रोखलं, उद्धव ठाकरे यांना कसं रोखणार?

Marathi Rangbhumi Din 2022 : मराठी रंगभूमी दिनी नाट्यरसिकांना मनोरंजनाची मेजवानी; जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणते नाटक…

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत शरद पवार सहभागी होणार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss