spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवाब मलिक कोणत्या गटासोबत? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची पंचाईत

नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला (Winter Assembly Session) सुरुवात होणार आहे.

नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला (Winter Assembly Session) सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाला नवाब मलिक हजेरी लावणार आहेत. नवाब मलिक हे वैद्यकीय तपासणीसाठी जामिनावर बाहेर आले आहेत. या अधिवेशनावेळी नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या आमदारांसोबत बसतात, की शरद पवार गटाच्या आमदारांसोबत हे पाहणे म्हत्वचे असणार आहे. आपण तटस्थ आहोत अशी भूमिका मलिक यांनी आतापर्यंत घेतली होती. आज नवाब मलिक अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. कामकाजात सहभागी होताना नवाब मलिक नेमके कोणत्या गटासोबत बसणार हे अद्याप स्पष्ट नाही.

नवाब मलिक यांच्याकडून अद्याप तरी तटस्थ म्हणू भुमिका जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांची वेगवेगळी बसण्याची व्यवस्था होणार नाही. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत गट म्हणून दोन्ही नेत्यांना मान्यता नसल्याने सर्व आमदार एकत्रीत बसण्याची शक्यता आहे. सभागृहात त्यामुळे आमदारांची नेमकी भूमिका काय हे पाहणे महत्त्वाचे आहे. पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने चतुराईने हा प्रश्न सोडावला होता.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकही अजित पवार गटाच्या गळाला लागल्याची चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. मात्र त्या चर्चाच होत्या आतापर्यंत नवाब मलिकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. त्यामुळे मलिक हे शरद पवार की अजित पवार गटाच्या बाजूला बसणार या चर्चांना आज अधिवेशनात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये ईडीने गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर नवा मलिकांनी प्रकृती अस्वास्थतेचे कारण देत अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. गेल्या वर्षभरापासून मलिक कोर्टाच्या परवानगीने कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात घेत होते. मलिकांनी बऱ्याचदा जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता. अखेर ११ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. जामीनाची मुदत संपत असल्यामुळे मलिकांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्याप्रकरणी सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत नवाब मलिकांच्या जामीनाला मुदतवाढ दिली आहे. परंतु राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपला पाठिंबा कोणाला याबाबत त्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही.

हे ही वाचा:

“माझी बायको ६ महिन्यांची गरोदर…”, शाहरुखनं चाहत्याच्या प्रश्नांला दिलं भन्नाट उत्तरं

ठाणे: मेट्रोच्या कामादरम्यान एका कामगाराचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss