रात्रभर एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाणे सोडलंच नाही, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा

रात्रभर एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाणे सोडलंच नाही, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा

जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आक्रमक झालेलं पाहायला मिळाले. गेल्या १६ तासांपासून एकनाथ खडसे पोलीस ठाण्यात ठिया मांडल्यानंतर शहर पोलीस स्टेशन समोर रस्त्यावर आंदोलन सुरू केले. रस्त्यावरच एकनाथ खडसे यांनी रात्री मुक्काम केला. न जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा एकनाथ खडसे यांनी पवित्रा घेतला आहे.अर्ज दाखल करुन घेतला असला तरी गुन्ह्याची नोंद अद्यापही केली नाही. त्यामुळं गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी एकनाथ खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळं पोलिसांची चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.

Diwali 2022 : दिवाळीत बनवा सोप्या पद्धतीने पौष्टिक “खजूरचे लाडू”

तब्बल ८ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी घेतली तक्रार

एकनाथ खडसेंच्या तब्बल आठ तासांच्या आंदोलनानंतर अखेर पोलिसांनी तक्रार घेतली आहे. दूध संघात अपहार नव्हे तर दूध संघात चोरी झाल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे. केवळ फिर्याद घेतल्याची पोलिसांनी पोहोच दिली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळं आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

हेही वाचा : 

खजूर खाल्याने आरोग्याच्या तक्रारी राहतील दूर…

संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाचा विरोध केला. तसेच पोलीस ठाण्याच्या बाहेर एकनाथ खडसे यांचे ठिया आंदोलन सुरू असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा एकनाथ खडसे यांनी घेतला आहे.

नेमकं प्रकरण काय?

जिल्हा दूध संघांत मालाच्या तपासणीत दूध संघातून १४ टन ८० लाखांचे पांढरे लोणी बाहेरच्या जिल्ह्यात पाठवण्याचे भासवण्यात आलं आहे. प्रत्यक्षात माल बाहेर गेल्याबद्दलच्या नोंदी आढळून आलेल्या नाही. तर दूधाच्या पावडरच्या साठ्यात ३० ते ३५ लाख रुपये किंमतीच्या ३६० बॅगची तफावत आढळून आली आहे. असे एकंदरीत १ कोटी १५ लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचे तपासणीतून समोर आले असून संबंधित माल हा दूध संघातील अधिकाऱ्यांच्या मदतीने इतरांनी चोरी केल्याचे दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. या तक्रारीनुसार संशयित आरोपी कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करावा असे लिमये यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

पोटा मधील सूज कमी करण्यासाठी या टिप्स फोल्लो करा

Exit mobile version