Ajit Pawar : ‘…त्या दिवशी हे सरकार जाईल”,अजित पवार पाहा काय म्हणाले?

Ajit Pawar : ‘…त्या दिवशी हे सरकार जाईल”,अजित पवार पाहा काय म्हणाले?

ajit pawar

बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत जिल्हा नियोजन समितीच्या कामांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मान्यता दिली. यात अपेक्षेप्रमाणे माजी पालकमंत्री अजित पवार यांनी सुचविलेल्या कामांना कात्री लावण्यात आली आहे. दरम्यान, यावरुन विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला ठणकावलं आहे. पवार म्हणाले, आर आर पाटील असताना १३ हजारांची पोलिस भरती केली होती. अनेक विभागाची भरती आमच्या सरकारच्या काळात काढली होती. पण, स्वतःच अपयश झाकण्याकरता शिंदे – फडणवीस सरकारने दीड दीड कोटी गुंतवणुकीचे असणार प्रकल्प बाहेर गेले आणि आता सांगत आहेत की, अनेक प्रकारचे प्रकल्प आणून इथे भरती करणार आहोत. तर असे असेल तर त्याची यादी दाखवा अशी खोचक मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

हेही वाचा : 

Arvind Kejariwal : गुजरातसह दिल्लीत निवडणुकीचा धुरळा, केजरीवाल मोठ्या पेचात

राज्यात ७५ हजार नोकऱ्या देण्याचा भाजपने प्रचार केला. ती चालू प्रोसेस असते. मधल्या काळात महाराष्ट्रातून मोठी इंडस्ट्री परराज्यात जात आहे. यामुळे सरकारला त्यांचचं मन त्याना खायला उठल आहे. म्हणून ते या नोकर भरतीचा प्रचार करत आहेत. भरती संदर्भात दोन वेगवेगळी नाव असताना एक नाव सांगून जनतेची दिशाभूल करतायत, माझ्याकडे सगळं सविस्तर आहे. मी शिर्डीच्या अधिवेशनात सगळं सांगणार आहे आणि या सरकारचा पर्दाफाश करणार आहे, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

‘… योग्य निर्णय घेण्यासाठी संजय शिरसाट यांना देव सद्बुध्दी देवो’ – सुषमा अंधारे

‘शिंदे सरकार पडणार’

राज्यातील सरकार कोसळणार असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार १६ आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असे बोलले जात होते. मात्र, आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केले आहे. राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असे ते म्हणाले.तसेच १४५ चा आकडा कमी झाला की सरकार पडणार, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी एकादशीनिमित्त फडणवीस दाम्पत्यांनी वारकऱ्यासोबत धरला ठेका ! पहा फोटो

Exit mobile version