Dasara Melava : “याच्यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही…”, शिंदेंवर राष्ट्रवादीचा निशाण

Dasara Melava : “याच्यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही…”, शिंदेंवर राष्ट्रवादीचा निशाण

बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येत आहे. ६ वाजता एकनाथ शिंदे मैदानावर उपस्थित राहणार आहेत. ८ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरवात होणार आहे. त्याआधी येथे जमलेलेल्या कार्यकर्त्यांच्या मनोरंजनसाठी पोवाडे गीते इत्यादि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अवधूत गुप्ते यांची गीते चालू आहेत.

दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे,जो उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे, हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळीं ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर आता उद्धव ठाकरे आपले भाषणातून कोणती भूमिका मांडणार आहेत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुल्लू येथील दसऱ्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रेत सहभागी

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळावा सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले आहते. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेचे नवे-जुने पदाधिकारी आणि इतर शिवसैनिक या मेळाव्याला हजेरी लावली असल्याचं दिसत आहे. बीकेसीचे मैदान पूर्णपणे भरून जाईल असा जनसमुदाय शिंदे गटाला अपेक्षित होते ते आता पाहायला मिळत आहे. पण याच दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभेला उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमधून लोकांना बळजबरी आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केली आहे. “यूपी, बिहार, बंगाल या परराज्याच्या कामगारांना बसमध्ये डांबून बीकेसीच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यास घेऊन जाणे याच्यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही…”, असे ट्वीट तपासे यांनी केले आहेत.

जरूर त्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा, पण ……; अजित पवार यांनी ठाकरे आणि शिंदे यांना खडसावले

दोन्ही गटांचे आमदार आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यातच मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काळात होणार असल्याने त्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी शिंदे गटाने आपल्या कार्यकर्त्यांना थेट पायी बीकेसीतील मैदान गाठण्यास लावले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील पायीच दादरच्या शिवाजीपार्ककडे रवाना झाले आहेत.

Exit mobile version