NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्टीनी घेतली राज्यपालांची भेट, सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याच्या मागणी

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्टीनी घेतली राज्यपालांची भेट, सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याच्या मागणी

गेल्या काही दिवसांपासून वारंवार आक्षेपार्ह विधाने करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली. राष्ट्रवादी नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुन्हा सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्यभर संताप उफाळला व सत्तार यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली. मुंबईतील सत्तार यांच्या शासकीय बंगल्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली घराच्या काचा फोडल्या त्याचबरोबर औरंगाबात येथील त्यांच्या राहत्या घरी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तर दुसरीकडे, राज्य महिला आयोगाने पोलिस महासंचालकांना पत्र लिहून सत्तार यांच्या विधानाप्रकरणी कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगितले आहे.

हेही वाचा : 

मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात रंगणार ‘आयपीएल’चे सामने; शिंदे यांनी दिले संकेत

खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मंत्री अब्दुल सत्तार यांनी चुकीच्या शब्दात वक्तव्य करुन आपले स्तर जाहीर केले आहे. महाराष्ट्रभर आज त्यांचा निषेध केला जात आहे. त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे यासाठी आम्ही आज राज्यपाल यांना विनंती केली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. राज्याच्या संस्कृतीला छेद देण्याचे काम सुरू आहे. लोकसभेत धडाडीने काम करणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी ही घटना घडली आहे, त्यामुळे आता आम्ही राज्यभर निषेध व्यक्त करणार आहे, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे महिलांविरोधी आहे. असंही जयंत पाटील म्हणाले.

Sai Tamhankar : ब्लोडमध्ये नाही, तर सई झळकते ‘या’ ट्रॅडिशनल लूक मध्ये

वादाचे कारण

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पन्नास खोक्यावरुन टीका केली होती. “पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? असा सवाल सुळे यांनी सत्तार यांना केला होता. यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? यावर सुळे यांनी प्रतिक्रिया देताना तुमच्या पन्नास खोके आले असतील म्हणूनच तुम्ही आम्हाला ऑफर करत आहात, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिले. या प्रत्युत्तराला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांनी शिवी दिल्याचे समोर आले आहे.

Eknath Shinde : एका ट्वीटमूळे CM एकनाथ शिंदेंना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पहा प्रतिक्रिया

Exit mobile version