spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अटक, राष्ट्रवादीचा मोर्चा पोलिसांनी अडवला

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.

ठाणे : आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर धडक मोर्चा काढण्यात आला होता मात्र, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे राष्ट्रवादीचा हा धडक मोर्चा पुढे जाऊ शकला नाही. दरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अटक केल आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठी माणसाने जेव्हा मुंबई हातात घेतली, तेव्हा 105 लोक न घाबरता बंदुकीच्या गोळ्यांना सामोरे गेले, शहीद झाले. पण आम्ही मुंबई घेतली. तेव्हा आता आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलवा, असे म्हणणार नाही तर आता त्यांना पळवून लावू, गरज पडली तर राजभवनात घुसू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. याच पाश्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राजभवनावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “एव्हाना आपण या राज्यपालांबाबत कधी बोलतच नव्हतो, त्यांनी महाराष्ट्राचा बराच वेळा अपमान केला, तरी फार मी काही लक्ष दिले नाही. कारण मराठी माणसांना ते काय बोलतात त्याविषयी काही वाटत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी महात्मा फुलेंचा अपमान केला मला वाटते तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी होती. महाराष्ट्राचे थोर कवी, दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे म्हणतात, “ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे”, यातच मराठी माणसाची ओळख आहे. असे आव्हाड यांनी म्हटले.

पैशाचे काय सांगताय, ब्रिटीशांना मराठी माणसानेच कर्ज दिले होते…

गुजराती, राजस्थानी लोक महाराष्ट्रातून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या कोश्यारी यांच्या वाक्यावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखला देत कोश्यारी यांना चांगलीच चपराक लगावली. डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “पैशाचे मराठी माणसाला काय सांगता? नाना शंकरशेठ हा मराठी माणूस इतका गर्भश्रीमंत होता की व्यवसायासाठी ब्रिटीशही त्यांच्याकडून कर्ज घ्यायचे. ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटीशांना कर्ज देणारा माणूस याच मुंबईतील मराठी होता, हे कोश्यारींनी ध्यानात घ्यावे. असे आवहान करत जितेंद्र आव्हाड यांनी राजभवनावर धडक मोर्चा काढला आहे.

हेही वाचा : 

ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे – प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना राज्यसभा खासदार

Latest Posts

Don't Miss