spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची सत्तारांवर टीका; छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी प्रेरित करणाऱ्या…

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर एकदा नव्हे अनेकदा आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी २४ तासांत माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना दिला आला आहे. सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार….झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.

यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी विरोध दर्शवला. सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात वापरलेल्या अपशब्दांच्या मुद्द्यावरुन कोल्हेंनी दोन ट्वीट केले आहेत. “कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी प्रेरित करणाऱ्या माँ जिजाऊ एक महिलाच होत्या, ज्योतिबांना स्त्री शिक्षणासाठी साथ देणाऱ्या सावित्रीमाई एक महिलाच होत्या, लोककल्याणकारी राजकारणाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या अहिल्यादेवी एक महिलाच होत्या,” अशी आठवण अमोल कोल्हेंनी सत्तार यांना करुन दिली आहे. अमोल कोल्हेंनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्याचसंदर्भातून त्यांनी हा दाखला दिसल्याचं दिसून येत आहे.

राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत खालच्या भाषेत टीका केल्याने सध्या मोठा वाद पेटला आहे. आज सिल्लोड मतदारसंघात आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्या सभा असल्याने सकाळपासूनच अब्दुल सत्तार यांचे नाव चर्चेत होते. श्रीकांत शिंदे यांच्या सभेच्यानिमित्ताने अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सिल्लोडमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन करून प्रकाशझोतात येण्याची संधी होती. मात्र, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये सर्व वातावरणच पालटले आहे. त्यामुळे काहीवेळापूर्वी शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या अब्दुल सत्तार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता तोंड लपवायची वेळ आली आहे.

हे ही वाचा :

Chitra Wagh : सत्तारांच्या विधानानंतर चित्र वाघ यांनी कंगना रानौतसाठी वापरलेल्या शब्दांचीही करून दिली आठवण

अब्दुल सत्तारांच्या औरंगाबाद येथील घरावर दगडफेक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss