spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक ज्योतिषाला हात दाखवतात; शरद पवारांचा शिंदेंना चिमटा

आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. दोन महिन्यात राज्य सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? असं पत्रकारांनी शरद पवार यांना विचारल्यास, त्यावर उत्तर देताना त्यांनी शिंदे यांना चिमटे काढले.

पवार म्हणाले, मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे सरकार कधी कोसळेल हे मी सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वास नाही. मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. हल्ली आपण नवीन गोष्टी पाहात आहोत, महाराष्ट्रात जे कधी घडलं नव्हतं. ते घडत आहे. ठिक आहे, असं पवार म्हणाले.

हेही वाचा : 

यापुढे अवमान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर… ; उदयनराजे भोसले संतापले

आसाममध्ये काय घडलं ते सर्व देशांनी पाहिलं. आता पुन्हा आसामची ट्रिप होणार आहे. वर्तमानपत्रातच आम्ही या बातम्या वाचतो. कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणं. त्यानंतर दुसरीकडे जाऊन हात दाखवणं या गोष्टी महाराष्ट्राला नवीन आहे. हे राज्य पुरोगामी आहे. विज्ञानाचा पुरस्कार करणारं राज्य म्हणून लौकीक आहे. त्या राज्यात या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक अशा गोष्टीकडे जातात. ज्योतिषाला हात दाखवतात, असा चिमटा त्यांनी काढला.

Dada Bhuse : … हात दाखविण्याचा कुठलाही प्रकार झालेला नाही : दादा भुसे

राज्यपालांनी केलेल्या विधानावर शरद पवार म्हणाले ,आतापर्यंत राज्यपालांनी विविध वक्तव्ये केली होती. एक मर्यादा म्हणून त्यावर भाष्य केले नव्हते. आता, मात्र राज्यपालांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घ्यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली. सीमावादाच्या प्रश्नावर भाजपला आपली जबाबदारी टाळता येणार नसल्याचेही पवार यांनी म्हटले. राज्यात शेतकरी अस्वस्थ आहे अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचं आहे. परंतु सरकार याबाबत गंभीर नसल्याची टीका पवार यांनी केली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत बोलताना पवार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात काय चर्चा झाली,याची कल्पना नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत याबाबत चर्चा करेल असेही त्यांनी म्हटले.

Measles Disease : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी गोवरनं बालकाचा मृत्यू

Latest Posts

Don't Miss