spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sharad Pawar सरत्या वर्षांने काय दिलं? आणि २०२३ कडून काय अपेक्षा?, राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल

आजची तारीख ३१ डिसेंबर. बरंच काही सांगून जाते… मागच्या वर्षभरात काही प्रश्न काही चांगल्या गोष्टी घडल्या… जे प्रश्न होते त्याला पर्याय शोधून सामना करण्याची आवश्यकता होती ती केली… आता आपण यातून मुक्त झालो, आता २०२३ वर्ष सुरु होईल.. १ तारीख उद्याच आहे. अवघा भारत देश औत्सुक्याने नव्या वर्षाची पाहतोय. येतं वर्ष नव्या आशा-आकांक्षांचं असेल, ५६ ते ६० टक्के लोक शेती करत आहेत. पाऊस चांगला झाला तर येणारं वर्ष चांगलं जाईल. शेती चांगली झाली तर क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढणं हे व्यापार उद्योगाला चांगले दिवस आणतं. बळीराजा यशस्वी झाला तर संबंध देशातील अन्य घटकांचेही दिवस चांगले येतात, अशा आशयाचे ट्विट राष्ट्रवादीकडून (NCP) करण्यात आले आहे. राष्ट्रवादीने भाजपा तसेच मोदी सरकारवर ट्वीटच्या माध्यमातून टीका केली आहे. या ट्वीटमध्ये भाजपाने दिलेली आश्वासाने तसेच आश्वासनांच्या पूर्ततेवर भाष्य करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Thane News ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, शिंदे गटाकडून हल्ला झाल्याचा आरोप

सुदैवाने मागील वर्ष ठीक गेलं.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत महत्वाचा निर्यातदार होऊ शकतो. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सुधारणा व्हायला हव्यात. सत्तेत कोणीही असलं तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावं लागेल. अर्थकारण हे आव्हान आहे. येत्या वर्षात त्याला सामोरं जाऊया. नव्या उमेदीने नव्या उत्साहाने नव्या वर्षाचं स्वागत करूयात, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

Rishabh Pant ऋषभ IPL 2023 मध्ये खेळणार का? दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदासाठी कोणते पर्याय

२०२२ या वर्षात मोदी सरकारने (Modi Govt) जनतेला अनेक आश्वासनं दिली. यातील काही आश्वसनं पूर्ण झाली तर काही आश्वासनं अद्याप अपूर्णच आहेत. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीने भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. नवे वर्ष सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे आश्वासनांचं काय झालं? असा सवाल राष्ट्रवादीने (NCP) केला आहे.

राशी भविष्य – ३१ डिसेंबर २०२२ ,धनु : राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग संभवत आहेत.

Latest Posts

Don't Miss