spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राजकोटच्या किल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना: Sharad Pawar

मालवण येथील राजकोट (Rajkot) या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatarpati Shivaji Maharaj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज १ सप्टेंबर रोजी “जोडे मारो आंदोलन” (Jode Maro Andolan) पार पडत आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत या मोर्चाचा मार्ग ठरवण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थित आंदोलकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत राजकोटच्या किल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना असल्याचे म्हंटले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यावेळी म्हणाले, “मालवणचा शिवछत्रपतींचा पुतळा सागरी वाऱ्याने उध्वस्त झाला” असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. पण आजही ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील शिवछत्रपतींचं शिल्प मजबुतीने उभं आहे आणि हेही शिल्प सागरी किनाऱ्याजवळच आहे. तरीही गेली ५० वर्ष हे शिवछत्रपतींचं शिल्प लोकांना प्रेरणा देत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक पुतळे उभे आहेत पण मालवणला उभा केलेला पुतळा सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा एक नमुना होता. त्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये निश्चित भ्रष्टाचार झाला आहे असा जनमानसांत समज आहे आणि हा शिवछत्रपतींचा तसंच संपूर्ण देशातील शिवप्रेमी लोकांचा अपमान आहे.,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

जोडे मारो आंदोलनात कोणाचा सहभाग?

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे. या आंदोलनासाठी मुंबईसह राज्यातील इतर भागांमधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

महायुतीकडूनही आंदोलनाची हाक

आज हुतात्मा चौक (Hutatma Chowk) ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती मात्र तरीही मविआकडून हे आंदोलन करण्यात आले. याशिवाय मविआच्या आंदोलनाला महायुतीने आंदोलनातूनच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) च्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या जोड्या मारो आंदोलनाच्या निषेधार्थ आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात दादर परिसरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. वेडे वटवटराव, मुंग्या राऊत, करामती काका, पेंग्विन राव, नाना तळीराम अशा आशयाचे फलक हातात घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर देत भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन केले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss