spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने सर्वच पक्ष कसून तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) अपेक्षित यश मिळाले नसले तरी यंदाच्या विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाड़ीत (Mahavikas Aghadi) जोरदार चुरस रंगणार आहे.शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhavv Thakeray) यांनी विनंती करूनही महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत मोठे भाष्य करत, “मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा संख्याबळावर होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत आता विचार करण्याचं काही कारण नाही,” असं म्हंटल आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP) प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले आनंद परांजपे ?

आनंद परांजपे यांनी शनिवारी (७ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मोठे वक्तव्य केले. यावेळी ते म्हणाले, “षण्मुखानंद हॉलमध्ये महविकास आघाडीचा मेळावा झाला. त्यावेळेला शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट मागणी केली होती कि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करून या निवडणुकीला महाविकास आघाडी सामोरी गेली पाहिजे. त्यांची ही मागणी साफपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने यांनी नाकारलेली दिसते. काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं आहे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल. शरद पवार यांनी देखील स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री पदाचा निर्णय निकाल नंतर महविकस आघाडी घेईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निवडणुकी पूर्वी घोषित करावा ही मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी साफ नाकारलेली आहे किंबहुना ती धुडकावली आहे. लोकसभेच्या निकालानंतर जो आत्मविश्वास हा काँग्रेसला आलेला आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला आलेला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत,” असे त्यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी कोल्हापूर येथे बुधवारी (४ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केले होते. ते म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याची आता काही कारण नाही. संख्याबळांनंतर यांचा विचार होईल. अनेक वेळेला असं घडलं, नेतृत्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्या असेल तेव्हा निर्णय घ्यायचा असतो. अद्याप काही ठरलेलं नाही. बहुमत नाही. बहुमत मिळेल असं वातावरण आहे. यात काही शंका नाही. पण आताच काही निर्णय घेण्याची आवश्यकता नाही,” असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “१९७७ साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीला कोणालाही पुढे केलेलं नव्हतं. जयप्रकाश नारायण यांनी सांगितलं, आणीबाणीला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. सर्वजण एकत्र आले. त्यानंतर निवडणुका झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव पुढं आलं. निवडणुकीत मत मागताना मोरारजी देसाई यांचं नाव कुठंही जाहीर केलं नव्हतं. त्यामुळे आताच नाव जाहीर केलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. आम्ही सर्वजण एकत्र बसून लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार या राज्याला देऊ. राज्यात आमची सातत्य येईल असे चित्र आहे. मात्र याचे नेतृत्व कोण करणार यावर अजून चर्चा झाली नाही. त्यामुळे याचा निर्णय आम्ही निवडणूक झाल्यानंतर घेणार आहोत,” असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

शिवरायांच्या पुतळ्याबाबत कालीचरण महाराज म्हणाले, नरेंद्र मोदींनी माफी मागितली हा…

CM Shinde यांचे गणरायाला साकडे, राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे…

बजरंग पुनियाचे ब्रिजभूषण यांना खुले आव्हान, ‘हिंमत असेल तर हरियाणामध्ये येऊन विनेशविरोधात प्रचार करा’

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss