spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

NCP : नागपूरमधील ‘रस्त्यांची रांगोळी’ म्हणत राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

मुंबईतील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात पडलेले खड्डे पुन्हापुन्हा बुजवूनही रस्त्यांची परिस्थिती फारशी बदलेली दिसत नाही. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो. वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण झाले आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी नेहमीच मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरले जाते. पालिकेवर सातत्याने टीका होते. अगदी इतर सरकारी यंत्रणांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठीही पालिकेला जबाबदार ठरवले जाते. त्यावर उपाय म्हणून पालिकेने मुंबईतील सर्व रस्ते ताब्यात घेऊन ते खड्डेमुक्त करण्याची ठोस भूमिका घेतली आहे.

हेही वाचा : 

World Food Day 2022 : जागतिक अन्न दिनानिमित्त काही खास विविध राज्यातील पारंपरिक पदार्थ

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे मुंबईतील ४५० किमीची रस्ते काँक्रिटचे करावेत असे आदेश दिले आहेत. येत्या दोन वर्षामध्ये मुंबईतील सर्व रस्ते कॉंक्रिटचे असतील, त्यावर एकही खड्डे दिसणार नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Nirmala Sitharaman : रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होत आहे : निर्मला सीतारामन यांचे विधान

देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंड असलेल्या नागपूरमधील ‘रस्त्यांची रांगोळी’ म्हणत राष्ट्रवादीने ट्वीटरवर एक फोटो शेअर करून देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर पेजवर नागपूरमधील खड्ड्यांची दुरावस्था झालेला एक फोटो शेअर करुन मुंबईच्या खड्ड्यांची चर्चा करता मग याही खड्डयांबाबत बोला अशी विचारणा करण्यात आली आहे. मुंबई खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री योजना जाहीर करतात मग फडणवीसांच्या नागपूरकडे का दुर्लक्ष करता असा सवालही राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

Latest Posts

Don't Miss