राष्ट्रवादीने केली कारवाई, अजित पवारांसह ९ जणांवर अपात्रतेची याचिका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांच्या अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने केली कारवाई, अजित पवारांसह ९ जणांवर अपात्रतेची याचिका

काल दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामॊठी घडल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर राज्यात पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

या सर्व राजकीय घडामोडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ सदस्यांनी राजभवनात जाऊन पक्षाच्या धोरणाविरोधात शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवून केलेली ही कारवाई आहे. त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांच्या अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्ष धोरणाच्या, हिताच्या विरोधात कारवाया करत शपथ घेतली ती त्यांची कृती बेकायदेशीर असून पक्षाला अंधारात ठेवल्याने याबाबत एका सदस्याने शिस्तभंग समितीकडे तक्रार केली त्यानंतर समितीच्या सूचनेवरून त्या ९ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान त्यांचे तात्काळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना ईमेल आणि व्हॉटस्ॲपवरद्वारे आणि त्यांच्या आय मेसेजवरदेखील पाठवण्यात आले आहे. सदस्यत्व रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरात लवकर बाजू ऐकून घ्यावी अशी विनंतीही केली आहे.याशिवाय निवडणूक आयोगालाही याबाबत कळवण्यात आले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवारसाहेबांसोबत आहेत. सर्व जिल्हयातील पक्षाचे अनेक पदाधिकारी समर्थनासाठी बाहेर आले आहेत. ९ आमदार म्हणजे पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी जी शपथ घेतली आहे ती पक्षाच्या अध्यक्षांना न सांगता केलेली कृती आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पावले उचलेल असे जाहीर केले होते त्यानुसार पावले आम्ही उचलली आहेत. विधानसभा अध्यक्ष याबाबत आम्हाला लवकरात लवकर सुनावणीला बोलवतील अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version