एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू मुंबईत दाखल

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू या मुंबईत दाखल झालेले आहेत.

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू मुंबईत दाखल

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू मुंबईत दाखल

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू या मुंबईत दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्रोपदी मुर्मू यांचे स्वागत केले. भाजप व शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची आज बैठक होणार आहे.

द्रोपदी मुर्मू या आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर देखील जाणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु संबंध दिवसभरात द्रोपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या भेटीचा ठराव नसल्याची माहिती समोर आली. द्रोपदी मुर्मू यांना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला होता.या आधीच्या राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर उमेदवारांनी मातोश्रीवर जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. परंतु आजच्या मुर्मू यांच्या मुंबई दौऱ्यात ते मातोश्रीवर जाणार की नाही? हा प्रश्न अजून सुटलेला नाही.

हेही वाचा : 

मन उडू उडू झालं मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

अंधेरीतील लीला हॉटेलमध्ये भाजप व एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदार आता जमलेले आहेत. त्याचबरोबर काही केंद्रीय मंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. आजच्या बैठकीत जवळपास 250 आमदार व खासदारा उपस्थिती आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारासह भाजपला पाठिंबा देणाऱ्या लहान घटक पक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर द्रोपदी मुर्मू यांचे स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी काही आदिवासी बांधव आपले लोकनृत्य सादर करत आहेत.

महाराष्ट्राचे राजकारण बीएमसीच्या मैदानात, शिवसेनेला विरोध करत मिलिंद दौरा यांचा फडणवीसांना पाठिंबा

Exit mobile version