spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नेटकरी काय थांबायचं नाव घेईना; Tiger is Back, #SanjayRaut ट्विटरवर ट्रेंडिंग!

आज १०२ दिवसांनंतर संजय राऊतांना जामीन सत्र न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर ईडीने संजय राऊतांच्या जामिनावर स्थगिती आणण्यासाठी सत्रज्ञायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगिती फेटाळली त्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली पण उच्च न्यायालयाने सुद्धा जामिनावरील स्थगिती नाकारली व संजय राऊत यांचा जामीन पूर्णतः मंजूर झाला त्यामुळे शिवसैनिक राज्यभरात आनंदाचे वातावरण होते. पेढे वाटून जल्लोष साजरा करत आहेत. तर संजय राऊत याना जमीन मंजूर झाल्याचे कळताच त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या घरात जोरदार तयारी करण्यात आली आहे . शिवसेनाच नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनीही राऊत यांना जामीन मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत . एकीकडे कार्यकर्ते तर जल्लोष साजरा करत आहेतच पण दुसरीकडे सोशल मीडियावर देखील संजय राऊत ट्रेंडिंग मध्ये आहेत.

आज ट्विटरवर संजय राऊत यांच्या सुटकेचा जल्लोष करण्यात आलाय. मिम्स तर एकसे बढकर एक आहेत. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, टायगर इज बॅक अशा अनेक घोषणा नुसत्या ऑफलाइन नाही तर ऑनलाइन सुद्धा देण्यात येत आहेत. आता तुम्ही म्हणाल ऑनलाइन कसं? बास्स का मिम्स, पोस्टर्स याची खरी मजा तर नेटकरी ऑनलाइनच घेतायत. चला तर मग बघुयात ट्विटरवर ट्रेंडिंग असणारे #sanjayRaut

आज संजय राऊतांना जमीन मंजूर झाला त्यामुळे राऊतांना संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना,राष्ट्रवादी ,आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून ट्विटरवर शुभेच्छा दिल्या जात आहेत . संजय राऊत सुटल्यानंतर शिवसैनिक ट्विटरवर संजयराऊतांच्या फोटो सहित टायगर इज बॅक अशी कॅप्शन देत ट्विट करत आहेत. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला या घोषणा तर सध्या सोशलमिडीयावर संजय राऊतांच्या फोटोसहित खूप गाजत आहेत . सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी एका वाघाचा पिंजऱ्यातून बाहेर पडतानाचा व्हिडीओ ट्विट केला त्यावर कॅप्शन #SanjayRaut ,#shivsena असा दिला, तर सुषमा अंधारे यांनी “Tiger is back… !!!! , #SanjayRaut ” असं ट्विट केलाआहे आणि अंबादास दानवे यांनीही “वह झुका नहीं All the Best #BJP” अस ट्विट केला आहे मग काय बाकी सगळ्या नेटकऱ्यांनी ट्विटरवर संजय राऊतांना शुभेच्छा करण्यास सुरुवात केली .

सध्या मिम्सची सोशल मीडियावर खूप चालती आहे , मिम्स म्हणजे एखाद्या विषयच विनोदी पद्धतीने सादरीकरण , तर या संदर्भातून मिम्स देखील बनवण्यात आले आहे , ट्विटरवर एकाने एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यात संजय राऊत यांच्यासारखा दिसणारा एका व्यक्ती डान्स करताना दिसत आहे . तर दुसऱ्या व्यक्तीने एका सिंहाचा व्हिडीओ शेअर केला आहे त्यात त्याने कॅप्शन दिले आहे की Welcome back #sanjayRaut तर अशा प्रकारचे अनंत ट्विट्स आहेत ज्यात #sanjayRaut हे प्रखर्षाने गाजत आहे

हे ही वाचा :

अरबाज खान आणि मलायका अरोरा पुन्हा एकमेकांच्या आवडीनिवडींचे कौतुक करू लागले

Facebook Meta Layoffs: मार्क झुकरबर्गचा मोठा निर्णय, फेसबूकमधील तब्बल ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

जेलमधून बाहेर पडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘आम्ही लढणारे आहोत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss