पुण्यात युवासेनेची नवीन बांधणी; नव्या नियुक्त्या जाहीर

पुण्यात युवासेनेची नवीन बांधणी; नव्या नियुक्त्या जाहीर

काही दिवसांपूर्वी शिवसेनेत मोठा बंड झाला त्यानंतर खरी शिवसेना कोणती यावरून दोन्ही गटात संघर्ष पहिला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिवसेना संलग्न संघटना म्हणजेच युवासेना सुद्धा आता मैदानात उतरली आहे. पुण्याच्या युवासेनेचे पोकळीक भरून काढण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुण्यातील काही युवा सेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने नवीन पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. शहर युवा अधिकारी, शहर समन्वयक, शहर चिटणीस, उपशहर युवा अधिकारी, विधानसभा युवा अधिकारी अशा वेगवेगळ्या पदावर अनेकांना संधी देण्यात आली आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडल्यानंतर शिवसेनेने पुन्हा पक्षबांधणीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. युवासेनेत मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून त्या कायम करण्यात येतील, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या नियुक्तीमध्ये शहर युवा अधिकारी, शहर समन्वयक, शहर चिटणीस, उपशहर युवा अधिकारी, विधानसभा युवा अधिकारी अशा वेगवेगळ्या पदावर अनेकांना संधी देण्यात आली आहेत.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी युवासेना मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तरुणांच्या प्रश्नांसाठी त्यांनी राज्यात अनेक शहरात दौरे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक तरुण शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे युवासेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले. त्यांनी पुण्यात या कामाला जोरदार सुरुवात केली आहे.

हे ही वाचा :

”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो”; संभाजी भिडे

‘बदल्यांच्या नावाखाली मंत्री अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात’,राजू शेट्टींचा राज्य सरकार गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version