शिंदे आणि ठाकरेंमध्ये आता नवा वाद; नवीन चिन्हेसुद्धा सारखीच!

शिंदे आणि ठाकरेंमध्ये आता नवा वाद; नवीन चिन्हेसुद्धा सारखीच!

शिवसेना फुटी नंतर खरी शिवसेना कोणती यावरून दोन्ही गटात वाद सुरु आहे. त्यातच शनिवारी निवडणूक आयोगाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि शिवसेना नाव चिन्ह गोठवणयत आलं. त्या नंतर दोन्ही गटात चिन्हा आणि नवासाठी सुद्धा मोठा संघर्ष दिसून येत आहे. निवडणूक आयोगानं (Election Commission) शिवसेनेचं (Shiv Sena) पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नवीन पर्याय सादर करण्यासाठी आज दुपारी १ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. अशातच शिंदे गट (CM Eknath Shinde) ठाकरेंच्या अडचणी पुन्हा वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे. चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटानं (Uddhav Thackeray) ज्या चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याच चिन्हांवर आता शिंदे गटानंही दावा केल्याची माहिती मिळत आहे. आता दोन्ही गटांकडून सारख्याच चिन्हांची मागणी केल्यामुळे ही चिन्हही आता निवडणूक आयोग बाद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडे चिन्हे आणि नावे सादर करण्याची शेवटची मुदत होती. त्याप्रमाणे दोन्ही गटांनी आपली चिन्हं आणि नावं सादर केली आहे. यामध्ये खूपच साम्य असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंनी मशाल, त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही तीन चिन्हं सादर केली आहे. तर शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्हं दिली आहेत. आता या दोन्हीत फक्त गदा आणि मशाल ही दोनच दोघांची वेगळी चिन्हं आहेत.

पक्षातील बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे गटाकडून सर्वात आधी पक्षाचं गटनेते पद, त्यानंतर पक्षप्रमुख पद आणि त्यापाठोपाठ थेट पक्ष आणि पक्षचिन्हावरच दावा करण्यात आला. सध्या दोन्ही गटांत पक्षचिन्हावरुन सुरु असलेली स्पर्धा राज्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणूक आयोगाकडून पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यानंतर दोन्ही गटांना आपापले पर्याय सादर करण्यासाठी निवडणूक आयोगानं आज (सोमवारी) दुपारी १ वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार, दोन्ही गटांनी आपापले पर्याय आयोगासमोर मांडले आहेत.

हे ही वाचा:

Raj thackeray : राज ठाकरे अयोध्येला जाणार?, अयोध्येतील महंतीच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

उद्धव ठाकरे यांची हाय कोर्टात धाव; निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version