Maratha Reservation मध्ये आली नवीन ट्विस्ट; फडणवीसांच्या भेटीनंतर Ramesh Kere Patil यांनी दिली प्रतिक्रिया

Maratha Reservation मध्ये आली नवीन ट्विस्ट; फडणवीसांच्या भेटीनंतर Ramesh Kere Patil यांनी दिली प्रतिक्रिया

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण (Maratha Reservetion) हा मुद्धा अधिकाधीक चिघळत चालला आहे. सुरुवातीला राजकीय वर्तुळात या आरक्षण मुद्द्यावरून अनेकांनी एकमेकांचे पाणउतारे केले जात आहेत. आरक्षण या मुद्द्याचे सांस्कृतिक राजकारण करून प्रत्येक पक्ष हा आपआपली राजकीय पोळी भाजून घेताना दिसत आहे. त्याचप्रमाणे या आरक्षणाचा एक कार्ड म्हणून वापर होताना दिसत आहे. अशातच आता मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटलांनी (Ramesh Kere Patil ) आरक्षणासाठी वेगळं आंदोलन उभं केलं आहे. केरे पाटलांचे आंदोलन आमचे आंदोलन नाही असं जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका आरक्षणासाठी दोन वेगवेळी आंदोलने आता मराठा समाजातून होताना दिसत आहेत. त्यामुळे आरक्षणावरून मराठ्यांमध्ये दोन गट पडले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मुंबईत जवाब दो आंदोलन (Jawab Do Andolan) करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) सागर बंगल्याबाहेर केरे पाटलांनी आंदोलनाची तयारी केली होती. मात्र त्यांची गाडी गिरगाव चौपाटीजवळ अडवण्यात आली. रमेश केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. फडणवीसांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केरे पाटील यांनी केलीय. सगळे राजकीय पक्ष फक्त मराठा समाजाला झुलवायचं काम करताय. पण ठोस भूमिका कुणीही घेत नाही अशी प्रतिक्रिया केरे पाटलांनी दिलीय.

यावर जरंगे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिल्या ?

आमचं राज्यात कुठेही आंदोलन सुरु नाही असं सांगत केरे पाटलांच्या आंदोलनापासून हात झटकले आहे. त्यामुळे  मराठा समाजामध्ये फूट पडली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. अशा जरांगे आणि केरे पाटलांची आंदोलनं ही मात्र वेगवेगळी होत आहेत. अशात केरे पाटलांचे आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून झालं आहे असं जरांगे म्हणत आहे. शिवाय फडणवीसांनी मराठेच मराठ्यांच्या अंगावर सोडले आहेत असा मोठा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आल्यावर केरे पाटलांची प्रतिक्रिया काय ?

जरांगेंच्या वक्तव्यावर केरे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. मी जी मागणी करत आहे ती अखंड मराठा समाजासाठीच करत आहे. जरांगे पाटील जे सांगत आहे की ओबीसी मधून आरक्षण हवे अशीच मागणी आम्ही करत आहोत. तीच मागणी आमची सुद्धा आहे. त्यांनी हे आंदोलन उभारलं त्याला आम्हीसुद्धा समर्थन दिल आहे. त्याचप्रमाणे मर्थ्यांसाठीच्या त्यांच्या प्रत्येक भूमिकांमध्ये आमचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे मराठा समाजात फूट पडली असे कुणीही समजू नये. असे रमेश केरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

कोकणात जाणाऱ्या अधिकच्या रेल्वेगाड्या वाढवणार; गणेशउत्सवासाठी Central Railway ने घेतला मोठा निर्णय

Uddhav Thackeray यांचा आज दिल्लीदौरा होणार सुरु; दरम्यान भेटणार ‘या’ महत्वाच्या नेत्यांना

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version