पंतप्रधानांच्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचार

सूरत डायमंड बोर्सचे काल (१७ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.

पंतप्रधानांच्या वक्तव्याचा ठाकरेंकडून समाचार

सूरत डायमंड बोर्सचे काल (१७ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. सूरतचा विकास झाला तर गुजरातचा विकास होईल आणि गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता देशभरातून उमटू लागले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मोदींच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

“मुंबईतील हिरे बाजार सूरतला नेल्याचं दुख नाही, पण खेद आहे. मुंबईत जो व्यवसाय सुरू होता, तो उठवून सूरतला घेऊन जात आहात. काल पंतप्रधान म्हणाले की गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, म्हणजे देश काय एवढा कमकवूत आहे का? पंतप्रधांना आठवण करून देतो की ते देशाचे पंतप्रधान आहेत. तुम्ही कधीतरी गुजरातचे मुख्यमंत्री होतात, तेव्हा असं बोलला असतात तर ठिक होतं. परंतु, देशाचे पंतप्रधानांच्या तोंडी अशी भाषा शोभून दिसत नाही”, असं ठाकरे म्हणाले आहे. आम्ही भावा-भावांप्रमाणे एकमेकांत मिसळून राहतो. आमचे कधी त्यांच्यासोबत वाद विवाद झाले नाहीत. सर्व उद्योग उचलून मुंबईला संपवण्याचा डाव आहे. आमच्याकडचे बंडखोरही सर्वांत आधी सूरतलाच पळून गेले होते, अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरे आज (१८ डिसेंबर) नागपूरमध्ये चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी गेले होते. आजचा आठवा दिवस असून त्यांनी आज विधान परिषदेत उपस्थित राहून विविध मुद्द्यांवरील चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर बाहेर येऊन पत्रकार परिषदेत वरील टीका केली आहे. डायमंड व्यापारी गुजरातला जात नाहीत. त्यांना दमदाटी करून सूरतला घेऊन जात आहेत. मुंबईतील उद्योग तुम्ही तुमच्या गावात नेत आहात, मग तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे? तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, गुजरातचे मुख्यमंत्री नाहीत, असंही पुन्हा ठाकरे म्हणाले आहे.

हे ही वाचा:

देशातील ‘या’ दोन दिवसांत मुसळधार पावसाचे थैमान

राज्यातील ग्रामपंचायतीचा कारभार आजपासून ठप्प होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version