मातोश्रीची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना फक्त किरीट सोमय्यावर विश्वास आहे – किरीट सोमय्या

kirit Somaiya On Sujit Patkar :  विरोधकांचे घोटाळे बाहेर काढून भ्रष्टाचार करणाऱ्यांना सळू का पळू करून सोडणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढला आहे.

मातोश्रीची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना फक्त किरीट सोमय्यावर विश्वास आहे – किरीट सोमय्या

kirit Somaiya On Sujit Patkar :  विरोधकांचे घोटाळे बाहेर काढून भ्रष्टाचार करणाऱ्यांना सळू का पळू करून सोडणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढला आहे. पोलीस आणि आयकर विभागाला आणखीन एक माहिती कन्फर्म झाली आहे की महापालिकेला सुजीत पाटकर यांनी दहा कोटींची बोगस बिलं दिली आणि महापालिकेचे दहा कोटी रुपये ढापले असा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. कोविडच्या नावाने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेने जी लूट चालवली होती त्याचा प्रत्यक्ष पुरावा गोळा करून मी आयकर विभाग, इडी आणि मुंबई पोलिसांना सुपूर्त करणार असल्याच सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

माझ्या सहकाऱ्यांनी जाऊन कांदिवली पूर्व येथील झोपरपट्टी क्र. २ काजूपाडा येथे पाहणी केली. साडेतीन कोटींची बोगस बिलं त्या झोपड्यांमधील दाखवली आहेत जे रजिस्टरचं नाहीये. कुर्ला परिसरात चार बोगस कंपन्या दाखवल्या त्यांना पावणे सहा कोटींची बिलं मंजूर केली आहेत. गिपीओच्या समोर बोराबाजार येथे आणखीन एक कपंनी दाखवली जो पत्ता महापालिकेला देण्यात आला आहे त्यावर वेगळीच माणसं असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

माझ्या माहितीप्रमाणे सुजीत पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २५ लाख रुपये महापालिकेतून ढापले. साडेबात्तीस कोटी रुपये त्यांना आले खर्च फक्त पाच सहा कोटी केले बाकीचे २५ कोटी रुपये ढापल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे लोकांचे मृत्यू झाले आहे म्हणून माझा आग्रह आहे मनुष्यवधाचा गुन्हा सुजीत पाटकर यांच्यावर दाखल करावा असंही यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. मी आरोग्य विभागाशी बोललो, तपास यंत्रणांसोबत बोललो आहे. FIR माझी असल्यामुळे मला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याच यावेळी किरीट सोमय्या बोलले.

मातोश्रीची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना फक्त किरीट सोमय्यावर विश्वास आहे. ती माहिती ते फक्त मलाच देतात मंग माहिती पुढे पाठवतो. उद्धव ठाकरे यांची गायब झालेली फाईल जसे बंगले गायब झाले तशी फाईल ही गायब झाली होती त्या फाईलची माहिती मातोश्रीकडूनच मिळाली होती. असं म्हणतं किरीट सोमय्या यांनी मातोश्रीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हा भ्रष्टाचार संजय राऊत यांचे संहकारी सुजीत पाटकर यांनी केल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. खोटी बिलं छापून पालिकेकडून खोटी बिलं घेऊन कोटी रुपये छापल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.

हे ही वाचा : 

अमित शाह यांचा महाराष्ट्रातला दुसरा दौरा ; एकनाथ शिंदे जाणार स्वागतासाठी

अजितदादा भावी मुख्यमंत्री झळकले मुंबईत बॅनर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version