Sunday, July 7, 2024

Latest Posts

Sujay Vikhe Patil यांची EVM आणि VVPAT तपासणीची मागणी, Nilesh Lanke यांनी दिली प्रतिक्रिया

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmadnagar Loksabha Election 2024) भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी ४० केंद्रांवरील ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅटची (VVPAT) पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmadnagar Loksabha Election 2024) भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी ४० केंद्रांवरील ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅटची (VVPAT) पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी ४७ हजार २०० रुपये याप्रमाणे एकूण १८ लाख ८८ हजार रुपयांचे शुल्कदेखील भरले आहे. परंतु आता यावर त्यांचे विरोधी उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawr) गटाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी टीका केली असून, “सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्वीकारावा,” अशी खोचक टीका केली आहे.

सुजय विखे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील १०, पारनेर १०, अहमदनगर येथील ५, शेवगाव-पाथर्डी येथील ५, कर्जत- जामखेड मधील ५, तसेच राहुरी येथील ५ अशा एकूण ४० केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली असून सर्वोच्च न्यायालय (Supreme Court Of India) आणि निवडणूक आयोगाने (Elction Commission of India) दिलेल्या अधिकारानुसार ही मागणी केल्याच सुजय विखे पाटील यांनी म्हंटले आहे.अशाप्रकारे मागणी करणारे सुजय विखे महाराष्ट्रात बहुतेक पहिलेच उमेदवार आहे.

याबाबत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते म्हणाले, “विखे कुटुंबाला इतिहास आहे. यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबियांकडून असंच करण्यात आले. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित करत एकअपराकारे केंद्रीय यंत्रणावरच विखेंनी आक्षेप घेतला आहे.सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्वीकारावा.”

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. आता सुजय विखे पाटील यांच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याच्या मागणीमुळे पुन्हा एकदा राह्याचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा

फडणवीसांच्या Encounter ची ही अयोग्य वेळ, दिल्लीला त्यांच्याकडूनच करून घ्यायचाय सत्तेचा मेळ

Uddhav Thackeray हे Balasaheb Thackeray यांच्या हिंदू मतांनी नाही तर Congress च्या मुस्लिम मतांमुळे विजयी: Nilesh Rane

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss