Saturday, July 6, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray हे Balasaheb Thackeray यांच्या हिंदू मतांनी नाही तर Congress च्या मुस्लिम मतांमुळे विजयी: Nilesh Rane

भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आज (गुरुवार, २० जून) पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना, "बाळासाहेबांची हिंदुत्वाची मतं उद्धव ठाकरे यांना मिळाली नाहीत तर काँग्रेसची मुस्लिम मते उद्धव ठाकरे यांना मिळाली," असे ते म्हणाले.

शिवसेना वर्धापनदिनानिमीत्त (Shivsena Foundation Day) काल (बुधवार, १९ जून) माटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे शिवसेना उबाठा पक्षाचा (Shivsena UBT) सोहळा पार पडला. यावेळीं, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना शिंदे गटासह (Shivsena) महायुतीवर (Mahayuti) जोरदार टीका केली. आता, भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आज (गुरुवार, २० जून) पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना, “बाळासाहेबांची हिंदुत्वाची मतं उद्धव ठाकरे यांना मिळाली नाहीत तर काँग्रेसची मुस्लिम मते उद्धव ठाकरे यांना मिळाली,” असे ते म्हणाले.

निलेश राणे यावेळी म्हणाले, “उद्धव ठाकरे हे नेल कटरला घाबरतात. त्यामुळे त्यांनी मोठ्या वार्ता करु नयेत. जे तुमच्यासोबत होते ते पहिले हे करायचे आता कोणी करत नाहीत. उद्धव ठाकरे षंड आहेत, तुम्ही बाळासाहेबांचा फोटो लावू नका मग तुमची तुम्हाला किंमत कळेल. बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे नेते, बाळासाहेबांची हिंदुत्वाची मतं उद्धव ठाकरे यांना मिळाली नाहीत. काँग्रेसची मुस्लिम मतही उद्धव ठाकरे यांना मिळाली त्यावरच ते जिंकून आले. काँग्रेसच्या मतांवरती उद्धव ठाकरे यांना हे माझं आहे असं वाटतंय. उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे मतदार आहेत.”

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील (Ratnagiri-Sindhudurg Loksabha Election) विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या पराभवावर भाष्य करत ते म्हणाले, “विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे रडीचा डाव आहे. २०१९ मध्ये आमचा पराभव आम्ही स्वीकारला रडारड करत बसलो नाही. पराभव अगोदर स्वीकारल्याने विनायक राऊत मुंबईचे मतदार झाले. त्यांना अगोदरच माहिती होतं की आपला पराभव नक्की आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे कोकणी जनतेचा अपमान आहे. कोकणी जनता तुम्हाला तुमच्या सारखी वाटते का ? विनायक राऊत यांनी कोकणी जनतेची माफी मागितली पाहिजे. पैशाने तुमचा पराभव झाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दहा वर्ष काम केलं पाहिजे होते. तुमच्या गावात तुम्ही मायनस का याचं कधीतरी जनतेला उत्तर द्या. पराभव स्वीकारण्याचं धाडस जिगर विनायक राऊत यांच्याकडे नाही. विनायक राऊत मनानी हरलेली माणसे आहेत.”

हे ही वाचा

हिंजवडीत येणार सुगीचे दिवस; Ajit Pawar नवीन योजनांची आखणी करणार

Prakash Ambedkar यांच्या Laxman Hake भेटीवर Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss