Friday, July 5, 2024

Latest Posts

मीरारोडच्या नायजेरियन लोकांनापण ओबीसींमधून आरक्षण द्या, Nilesh Rane यांची Manoj Jarange Patil यांच्यावर मिश्किल टीका

भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करत, "मीरारोड परिसरात अनेक वर्षापासून नाईजेरियन लोकं राहतात उद्या ही मंडळी त्यांना पण ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणायला सुरू करतील," असे वक्तव्य त्यांनी केले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल (रविवार, २३ जून) माध्यमांशी संवाद साधत मुस्लिम समाजालाही (Muslim Reservation) ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) द्यावे हि मागणी केली होती. आता त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करत, “मीरारोड परिसरात अनेक वर्षापासून नाईजेरियन लोकं राहतात उद्या ही मंडळी त्यांना पण ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणायला सुरू करतील,” असे वक्तव्य त्यांनी केले.

निलेश राणे यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून मनोज जरांगे पाटील यांच्या मुस्लिम आरक्षणसंदर्भाच्या विधानावर मिश्किल शब्दात टीका केली. ते म्हणाले, “मी आजही स्वतंत्र मराठा आरक्षणावर ठाम आहे पण काल काहीतरी मुसलमानांना पण ओबीसीतून आरक्षण द्या असं काहीतरी कानावर आलं. हा शोध कुणी लावला??? आणि हे सगळे विषय जोडून मराठ्यांचा अजून किती नुकसान करणार आहात?? मीरा रोड परिसरात अनेक वर्षापासून नाईजेरियन लोकं राहतात उद्या ही मंडळी त्यांना पण ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणायला सुरू करतील. काय चाललय??” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता मराठा समाजासह मुस्लिम समाजालाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे (Muslim Reservation) अशी मागणी केली आहे. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांनी काल (रविवार, २३ जून) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हि मागणी केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मुस्लिम समाजाच्या सरकारी नोंदी ओबीसी मधून निघाल्या आहे. यामुळे मुस्लिमांना देखील ओबीसी मधून आरक्षण द्या. कसं देत नाही ते बघतो. आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही १६ टक्के आरक्षण दिले कसं? आम्ही भाऊ मानलं मात्र तुम्ही आमच्या ताटात औषध कालवल आहे. लोहार, कुंभार समाजाच्या देखील सरकारी नोंदी आधारे आरक्षण द्या. बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षण सोडून सगळं आरक्षण रद्द करा, वरचे १६ टक्के उडवून टाका.”

हे ही वाचा

Manoj Jarange Patil यांच्या मागणीचा हेतू राजकीय? आरक्षण म्हणजे खिरापत नाही, Laxman Hake यांचा हल्लाबोल

मुस्लिमांना देखील OBC मधून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss