spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nilesh Rane यांचा Supriya Sule यांच्यावर हल्लाबोल, जास्त हसून बोलणारी लोकं…

सुप्रिया सुळे यांनी काल जे भाषण केले आहे त्यांच्या या भाषणावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका ही केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या उलथापालथी या होत आहेत. दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड ही घडली आणि त्यामुळे राज्यातील वातावरण हे पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून काढता पाय घेत बंड केला. आणि आता पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर आज दिनांक ५ जुलै रोजी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील या संदर्भात नेत्यांची बैठक बोलावली आहे. यावेळी भाषण देत असताना शरद पवार यांच्या गटातील नेत्या, राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाषण केले. या भाषणात संघर्षाच्या काळात आपण वडिलांसोबत असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला.

सुप्रिया सुळे यांनी काल जे भाषण केले आहे त्यांच्या या भाषणावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका ही केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खोटारडेपणाचा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे हे त्यांच्या ट्विट मध्ये म्हणाले आहेत की, खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण ऐकून असं वाटतं की लहानपणी जेव्हा आपल्याला टीचर वडिलांवरती एक पान लिहायला सांगायची, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंकडे स्वतःच्या वडिलांबद्दल सांगण्या पलीकडे काही नाही. जास्त हसून बोलणारी लोकं ही नेहमी खोटारडी असतात हे आजपर्यंतचा जाणवलं म्हणून खासदार सुळे जेवढ्या बोलतील तितकं त्यांच्या विरोधकांना चांगलंच आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या ?

सुप्रिया सुळे यांनी भाषणातून व्यक्त होताना त्यांनी भाजपवर मोठी टीका केली. त्याचबरोबर सुप्रिया सुळे असे देखील म्हणाल्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही. बाकी कोणाबद्दलही बोला, माझ्याबद्दलही बोला पण आई वडिलांवर जायचे नाही. मी एक महिला आहे, थोडा काही बोलले तरी प्रत्येक महिलेच्या डोळ्यात पाणी येते परंतु संघर्षाच्या वेळी तीच महिला पदर खोचून अहिल्याबाई होळकर आणि राणी ताराबाई बाऊ शकते ते दाखवून देण्याची आता वेळ आली आहे. तसेच सुप्रिया सुळे असं देखील म्हणाल्या , आता संघर्षाची वेळ आली आणि आणि त्यामुळेच तुम्हाला माझ्या निर्णयावर आणि संघर्षावर आपली जबाबदारी लाख पटीने वाढली आहे. आणि हि लढाई एका व्यक्तीच्या विरुद्ध नसून ही लढाई भारतीय जनता पार्टीच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे

काही लोकांचे म्हणणे आहे त्यांचा आता वय झाले आहे तर त्यांनी फक्त आशीर्वाद झाले असं म्हणत अजित पवार यांच्यावर टोला लगावला आहे. रतन टाटा यांचे उदाहरण देत टाटा ग्रुप चे अजूनही सगळे निर्णय आणि सगळ्या गोष्टी सांभाळतात. अशा अनेक लोकांच्या उदाहरणे देऊन त्यांनी वय किती देखील असले तरी वय कितीही वाढले असले तरी देखील जिद्द असायला हवी आणि ती जिद्द अजूनदेखील पवार साहेबांची आहे हे यांनी सांगितले. तसेच बापाला घरी बसा म्हणणाऱ्या पोरापेक्षा आम्ही मुली बऱ्या, रतन टाटा या वयातही काम करतात, अमिताभ बच्चन ८० उलटल्यानंतरही जाहिरातीत दिसतात याचाही दाखला सुप्रिताताईंनी भाषणात दिला आहे.

हे ही वाचा:

कॅनडानंतर आता लंडनमध्ये Khalistan समर्थकांची रॅली, भारताविरुद्ध नवे षड्यंत्र!

Manipur मधील हिंसाचारात १२० ठार, तर पुन्हा वाढवली इंटरनेट बंदी …

सामनातून शिंदेंवर हल्लाबोल, राज्यात सत्तेसाठी गुवाहाटीत ‘रेडा’ बळी दिला, पण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss